घरCORONA UPDATEक्वारनटाईनचे उल्लंघन करणाऱ्यांना गोळ्या घाला- राष्ट्रपती

क्वारनटाईनचे उल्लंघन करणाऱ्यांना गोळ्या घाला- राष्ट्रपती

Subscribe

जगभरात हाहाकार उडवणाऱ्या कोरोना व्हायरसने फिलिपाईन्समध्येही शिरकाव केला आहे. यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी फिलिपाईन्समध्येही लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र क्वारनटाईन करण्यात आलेले नागरिक रस्त्यावर उतरून पोलिसांबरोबर हुज्जत घालत आहेत. यामुळे पोलिसांबरोबरच इतर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहील्याने क्वारनटाईनचा उल्लंघन करणाऱ्यांना गोळ्या घाला असे आदेश फिलिपाईन्सचे राष्ट्रपती रोड्रीगो दूट्र्टे यांनी दिला आहे.

फिलीपाईन्समध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे. यामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. यामुळे सामान खरेदीसाठी लोक गर्दी करत आहेत. लॉकडाऊन हटवण्यासाठी सरकारवर दबाव आणला जात आहे. क्वारनटाईन लोकही नियम मोडून मोकाट फिरत आहेत. यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता बळावली       आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रपती रोड्रीगो दूट्र्टे यांनी क्वारनटाईनचे उल्लंघन करणाऱ्यांना गोळ्या घाला असे आदेश दिले आहेत. बुधवारी रात्री दूट्र्टे यांनी देशाला उद्देशून भाषण केले. त्यावेळी त्यांनी पोलिसांना हा आदेश दिला. या आदेशामुळे खळबळ उडणार हे माहित असल्याने अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

- Advertisement -

यासाठी दूट्र्टे यांनी डाव्यांना जबाबदार ठरवले आहे. तसेच तुम्ही सरकारमध्ये नसून जर तुम्ही सरकारी कामात अडथळा आणाल. जाणूनबुजून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला कोरोनाचे संकट संपेपर्ंयत तुरुंगात डांबण्याचा आदेश देण्यात येईल. पोलिसांना आणि लष्कराला मी आदेश दिले आहेत की जर लोक भांडत असतील आणि तुमच्या जीवाला धोका असेल तर सरळ गोळ्या घाला. संकट निर्माण करणाऱ्यांना मी सरळ स्मशानात पाठविन असाही धमकीवजा संदेश दूट्र्टे यांनी जनतेला दिला् आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -