घरCORONA UPDATEभारतातील सक्रीय रुग्णांची संख्या ५ लाखांहून कमी

भारतातील सक्रीय रुग्णांची संख्या ५ लाखांहून कमी

Subscribe

पाच लाखांपेक्षा कमी सक्रिय रुग्ण संख्या असण्याचा हा आजचा तिसरा दिवस आहे. एकूण बाधित संख्येत त्यांचा वाटा ५.५५ टक्के आहे.

भारताताली सक्रिय रुग्ण संख्या ५ लाखांहून कमी असून, ती ४,८५,५४७ इतकी आहे. पाच लाखांपेक्षा कमी सक्रिय रुग्ण संख्या असण्याचा हा आजचा तिसरा दिवस आहे. एकूण बाधित संख्येत त्यांचा वाटा ५.५५ टक्के आहे.

नवीन रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणार्‍या रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे हे शक्य झाले आहे. ज्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. एकूण ४४,८७९ नवीन नोंदविलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत २४ तासांत ४९,०७९ रुग्ण बरे झाले आहेत, नवीन रुग्ण संख्येपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक असण्याचा भारतातील हा कल सलग ४१ व्या दिवशी कायम आहे. देशात बरे झालेली रुग्णसंख्या ८१,१५,५८० तर बरे झालेला रुग्णदर ९२.९७ टक्के इतका आहे. बरे झालेली रुग्णांची संख्या आणि सक्रिय रुग्णसंख्या यातील फरक सातत्याने वाढत आहे. सध्या तो ७६,३१,०३३ इतका आहे.

- Advertisement -

बरे झालेल्या रुग्णसंख्येपैकी ७७.८३ टक्के संख्या ही १० राज्ये, केंद्रशासित प्रदेशामधील आहे. एका दिवसात मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याची नोंद महाराष्ट्रात करण्यात आली आहे. ७,८०९ नव्याने बरे झालेल्या रुग्ण संख्येमुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १६,०५,०६४ वर गेली आहे.

२४ तासात १० राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये साधारण ७९.३४ टक्के अर्थात ५४७ मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी २२.३ टक्के मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात करण्यात आली आहे, जिथे १२२ मृत्यू झाले आहेत. दिल्ली आणि पश्चिम बंगाल येथे अनुक्रमे १०४ आणि ५४ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -