‘या’ अवस्थेत सापडले शिक्षक-शिक्षिका; गावकऱ्यांनी दिला चोप

Namakkal
villagers beat class teacher in tamilnadu due to sex with anganwadi worker
शाळेत अंगणवाडी सेविकेसोबत शिक्षकाचा संभोग; गावकऱ्यांनी चोपले

तमिळनाडूच्या नामक्कल येथील एका शाळेत अंगणवाडी सेविकेसोबत शारीरीक संबंध करताना एक शिक्षक रंगे हात पकडला गेला. ज्ञान मंदिरात अशा प्रकारचे कृत्य केल्यामुळे शाळा प्रशासनासह गावातील सर्व नागरिक प्रचंड संतापले. त्यामुळे मंगळवारी शाळेत मोठा गोंधळ झाला. गावकऱ्यांनी शिक्षकाला शाळेबाहेर काढून त्याला प्रचंड मारहाण केली. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांनी शिक्षक आणि अंगणवाडी सेविकेच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – नियम बदलले! PF चे पैसे काढणे आता एकदम सोप्पे

मारहाण करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव सर्वनन असे आहे. सर्वनन उडुप्पमच्या ग्रामपंचायत शाळेत शिकवत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचे एका अंगणवाडी सेविकेसोबत प्रेमसंबंध होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी शाळा सुटल्यावर तो अंगणवाडी सेविकेसोबत कथितरित्या सेक्स करताना आढळून आला. दरम्यान, याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. शाळा प्रशासनाने या शिक्षकाला नोटीस बजावली असून या कृत्यावर स्पष्टीकरण मागितले आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन शिक्षकावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती शाळेचे प्राचाऱ्य जयराज यांनी दिली आहे. याशिवाय अंगणवाडी सेविके विरोधातही कठोर कारावई करण्याची मागणी केली जात आहे.