घरदेश-विदेश...म्हणून पंतप्रधान होते केजरीवालांच्या शपथविधीला गैरहजर!

…म्हणून पंतप्रधान होते केजरीवालांच्या शपथविधीला गैरहजर!

Subscribe

अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला अन्य राज्याचे मुख्यमंत्री किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं नाही. या सोहळ्यासाठी खास दिल्लीतील जनतेला आमंत्रित करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र पंतप्रधान मोदी या सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे केजरीवाल्यांच्या शपथविधीला पंतप्रधान उपस्थित नव्हते असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. शपथविधी सोहळा झाल्यांनंतर जनतेला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रण दिलं होतं. मात्र ते व्यस्त असावेत. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत.

म्हणून पंतप्रधान होते गैरहजर

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथे होते. त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित होता. अरविंद केजरीवाल यांचा हा शपथविधी सोहळा दिल्लीत सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथे होते.
त्यामुळे ते शपथविधीला अनुपस्थित होते. वाराणसी येथे त्यांनी जंगमवाडी मठाला भेट दिली. तेथे पूजाअर्चा केली. त्यानंतर ते जगतगुकरू विश्वराद्य गुरूकुल शतकोत्सव सोहळ्यासाठी गेले. तेथे त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले.

- Advertisement -

या शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनासह दिल्लीच्या विकासात योगदान देणाऱ्या, रिक्षा चालक, सफाई कामगार, बस मार्शल अग्निशमन दलाचे जवान आणि डॉक्टर यांनी विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं. केजरीवाल यांनी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, राजेंद्र पाल गौतम, कैलाश गेहलोत, इमरान हुसेन यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -