घरदेश-विदेशहिंदु-मुस्लिम वाद हवा कशाला?अरविंद केजरीवालांचा पंतप्रधानांना सवाल

हिंदु-मुस्लिम वाद हवा कशाला?अरविंद केजरीवालांचा पंतप्रधानांना सवाल

Subscribe

सत्तेत ४ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर हिंदु-मुस्लिम वादावर बोलणे अयोग्य असल्याचे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. तसेच केवळ शिक्षणानेच देश अव्वल स्थान मिळवू शकतो असा विश्वास देखील अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला.

४ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदु- मुस्लिम वादावर बोलणार असतील तर केंद्र सरकारने काहीच मिळवले नसल्याची टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. इंदौर येथे आजोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. आझमगढ येथे बोलताना काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. पंतप्रधानांच्या याच विधानाला लक्ष्य करत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. ४ वर्षानंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदु-मुस्लिम असा भेदभाव करणार असतील तर केंद्र सरकारने काहीही मिळवले नसल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. इंदौर येथे ‘अाप’च्या कार्यकर्त्यांसाठी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. शनिवारी आझजगढ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तलाकच्या मुद्यावर काँग्रेसला लक्ष्य केले. आजघडीला अमेरिका नॅनो टेक्नॉलॉजीवर बोलते, जपान, इंग्लंड मोठ मोठे प्रकल्प आणि तंत्रज्ञानावर बोलते पण आपले पंतप्रधान हिंदु-मुस्लिमचे तुणतुणे वाजवतात असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

फक्त शिक्षणच देशाला पहिल्या क्रमांकावर आणू शकते. पण मागील ७० वर्षापासून एकाही सरकारने शिक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठी जोमाने प्रयत्न केले नाहीत. आपल्या देशात जगातील सर्वात बुद्धीमान लोक आहेत. पण घाणेरड्या राजकारणामुळे त्यांना हेतुत: अशिक्षित ठेवण्यात आल्याचे देखील केजरीवाल यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -