घरदेश-विदेशविश्व अहिंसा दिनीच शेतकर्‍यांना मारहाण

विश्व अहिंसा दिनीच शेतकर्‍यांना मारहाण

Subscribe

राहुल गांधींची सरकारवर टीका

उत्तर प्रदेशच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना झालेल्या मारहाणीवरून आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. विश्व अहिंसा दिनालाच सरकार शेतकर्‍यांना मारहाण करतेय अशा आशयाचे वक्तव्य गांधींनी ट्विटरवर केले आहे.

संपूर्ण कर्जमाफीसह इतर अनेक मागण्यांसाठी राजस्थान, उत्तराखंडसह उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातील शेतकर्‍यांनी सप्टेंबरमध्ये हरिद्वारमध्ये शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली. भारतीय किसान युनियनने काढलेला हा मोर्चा मंगळवारी राजधानी दिल्लीत धडकणार होता.

- Advertisement -

राष्ट्रपिता महात्मा गांधींची १५०वी जयंती असल्यामुळे राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच २ वर्षें चालणार्‍या १५०व्या गांधी जयंती महोत्सवाचे उद्घाटनही मंगळवारी दिल्लीत झाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करता या शेतकर्‍यांना दिल्लीत येण्यास परवानगी नाकारण्यात आली. पण आधीच संतापलेले शेतकरी ऐकत नव्हते म्हणून त्यांना रोखण्यासाठी अश्रू गॅसचा वापर करण्यात आला. नि:शस्त्र शेतकर्‍यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमारही केला. या कारवाईचाच राहुल गांधींनी निषेध केला आहे.

‘विश्व अहिंसा दिवशीच भाजपच्या २ वर्षे चालणार्‍या गांधी जयंती महोत्सवाची सुरुवात शांततापूर्वक आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना अमानुषपणे मारहाण करून झाली. आता शेतकरी आंदोलन करण्यासाठी दिल्लीतही येऊ शकत नाही का?’ अशा शब्दांत गांधींनी नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

आक्रमक कारवाई नाही

पोलिसांनी केलेल्या आक्रमक कारवाईचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी समर्थन केले आहे. पोलिसांनी आक्रमक कारवाई केलेली नाही. पोलिसांनी आपल्या बचावासाठी कारवाई केली आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे राजनाथ सिंह म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -