घरमनोरंजनमाझ्यामुळे चित्रपट झाला फ्लॉप - आमिर खान

माझ्यामुळे चित्रपट झाला फ्लॉप – आमिर खान

Subscribe

'थग्स ऑफ हिंदूस्तान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर न चालल्यामुळे आमिरने माफी मागितली आहे. चित्रपट फ्लॉप होण्याची जवाबदारी त्याने स्वःतावर घेतली आहे.

बॉलिवूड परफेक्शनीस्ट आमिर खान याचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘थग्स ऑफ हिंदूस्तान’ ला प्रेक्षकांनी पाठ फिरवली. आपल्या प्रत्येक चित्रपटात आमिर भूमिकांसाठी विशेष महेनत घेतो. याचित्रपटामध्ये आमिर एका वेगळ्या लुकमध्ये दिसून आला होता. मात्र आमिरची तुलना हॉलिवूड कलाकार जॉनी डेप (कॅप्टन जॅक स्पॅरो) याच्या भूमिकेशी करण्यात आली. या चित्रपटाच्या फ्लॉप बद्दल कोणताही कलाकार प्रतिक्रिया देत नसताना अभिनेता अामिर खान याने प्रतिक्रिया देत ही जबाबदारी स्विकारली आहे. तसेच चित्रपटाच्या फ्लॉपसाठी त्याने माफी मागितली आहे. चित्रपट फ्लॉप झाल्याने दिग्गज कालाकारांच्या अभिनयावरही प्रश्नचिन्ह उठवण्यात आले होते.

काय म्हणाला आमिर

आमिर खान म्हणाला की,”थग्स ऑफ हिंदूस्तान लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही याची मला कल्पना आहे. याची पूर्ण जाबाबदारी मी घेतो. आम्ही चूकी असे असे मला वाटते. आम्ही पूर्ण प्रयत्न केला होता मात्र तो कुठे कमी पडला. काही लोकांना हा चित्रपट आवडला असल्याचे कळाले मात्र त्यांची संख्या खूप कमी आहे. जे प्रेक्षक माझा चित्रपट बघण्यासाठी आले होते मी त्यांची माफी मागतो की त्यांचे मनोरंजन करु शकलो नाही. प्रेक्षक खूप आशांनी माझा चित्रपट बघण्यासाठी आले होते मात्र त्यांच्या आशा पूर्ण होऊ शकल्या नाही. मी माझ्या चित्रपटांवर खूप प्रेम करतो. ते माझ्या मुलांप्रमाणे आहेत.

- Advertisement -

चीन मध्येही होणार प्रदर्शित

डिसेंबर महिन्यात थग्स ऑफ हिंदूस्तान या चित्रपटाला चीन येथे प्रदर्शित केले जाणार आहे. यासाठी निर्मात्यांनी पूर्ण तयारी केली आहे. मात्र भारतात या चित्रपटाला लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही तर आता चीन मधील प्रेक्षक या चित्रपटाला कसा प्रतिसाद देणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता आमिर खान या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र दिसले. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५० कोटींची कमाई केली होती. मात्र फ्लॉप ठरवल्याने पुढील काही दिवसात १५० कोटींच चित्रपटाने कमावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -