घरताज्या घडामोडी'आशिकी' फेम राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका, नानावटी रुग्णालयात केलं दाखल

‘आशिकी’ फेम राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका, नानावटी रुग्णालयात केलं दाखल

Subscribe

११९० मधला सुपरहिट चित्रपट ‘आशिकी’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणार अभिनेते राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आहे. अभिनेते राहुल रॉय कारगिलमध्ये एका चित्रपटाचे शूटिंग करत होते. परंतु शूटिंग दरम्यान त्यांची अचानक प्रकृती बिघडली आणि त्यांना ताबडतोब मुंबईतल्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, राहुल यांना दोन दिवसांपूर्वीच नानावटी रुग्णालय दाखल केलं गेलं आहे.

माहितीनुसार, ५२ वर्षीय राहुल रॉय सध्या आयसीयूमध्ये आहेत. त्यांना ब्रेन स्ट्रोक झटका आला आहे. परंतु सध्या राहुल रॉय सुरक्षित असून त्यांच्यावरील होणाऱ्या ट्रिटमेंटवर ते रिस्पॉन्ड करत आहेत. त्यांची प्रकृती ठिक होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. बऱ्याच काळानंतर चित्रपटात काम करणारे राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका येणे हे ऐकूण सर्वजण हैराण झाले आहेत. राहुल यांचे सर्व चाहते ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

- Advertisement -

राहुल रॉय यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअर विषयी बोलायचे झाले तर, त्यांनी १९९० साली ‘आशिकी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. या चित्रपटातून त्यांना इतकी लोकप्रियता मिळाली की, त्यांनी ‘आशिकी’ या चित्रपटानंतर ४७ चित्रपटावर साईन केली. पण ‘आशिकी’नंतरचे त्यांचे जास्त चित्रपट चालले नाही. ते लाईमलाईटपासून दूर झाले. त्यानंतर राहुल रॉय बिग बॉस सीझन १ विजय होऊन पुन्हा एकदा चर्चेत आले. पण त्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले नाहीत. आता इतक्या वर्षानंतर ते चित्रपट LAC- Live the Battle दिसणार आहेत. राहुल यांच्या या चित्रपटाचे शूटिंग कारगिलमध्ये सुरू होते. परंतु प्रकृतीच्या कारणामुळे हा प्रोजेक्ट आता मधेच अडकला आहे.


हेही वाचा – लवकरच आदित्य नारायण मंदिरात उरकणार लग्न

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -