घरमनोरंजनछोट्यांच्या रामलीलात अभि-अॅशची आराध्य बनली सीता

छोट्यांच्या रामलीलात अभि-अॅशची आराध्य बनली सीता

Subscribe

कलाकार जोडी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची कन्या आराध्याने आपल्या अभिनयाची झलक छोट्या रामलीलात दाखवली आहे.

बॉलीवूडमधील कलाकार किड्ससुद्धा लहानपणापासूनच आपल्या अभिनय आणि इतर अॅक्टिव्हिटीजची चुणून दाखवताना अनेकदा दिसले आहेत. कलाकार जोडी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची कन्या आराध्या हिनेदेखील आपल्या अभिनयाची झलक छोट्या रामलीलात दाखवली आहे. नुकताच तिचा छोट्यांच्या रामलीलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये आराध्या सीतेच्या वेशभूषेत दिसत आहे. विशेष म्हणजे याच रामलीलामध्ये आमिर खानचा मुलगा आझाद रामच्या वेशभूषेत पाहायला मिळत आहे.

आमिरचा मुलगा आझाद बनला राम

शाहरुख खानचा अबराम, सैफ अली खान तैमुर, अभिषेक बच्चनची आराध्या हे स्टारकिड्स सतत चर्चेत असतात. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. असाच आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आराध्या आणि आझाद राम- सीतेच्या वेशभूषेत पाहायला मिळत आहेत. आराध्या आणि आझादने शाळेतील नाटक स्पर्धेत राम-सीतेची भूमिका साकारली होती. त्याचेच काही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. आराध्या आणि आझाद धिरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहेत. शाळेतील एका नाटक स्पर्धेत दोघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये आझादने रामाची तर आराध्याने सीतेची भूमिका साकारली आहे. अभिषेक- ऐश्वर्याच्या फॅनक्लबकडून हे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

- Advertisement -

शाळेतील विविध कार्यक्रमात घेतात भाग 

शाळेतील या कार्यक्रमाला आराध्याची आई ऐश्वर्या आणि आझादची आई किरण राव उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. शाळेकडून आयोजित केलेल्या या रामलीलेत आराध्या आणि आझादने सर्वोत्तम परफॉर्म केले. शाळेतील विविध स्पर्धेत हे दोघंही आवर्जून सहभाग घेतात. याआधीही दोघांनी स्टेजवर परफॉर्म केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -