घरमनोरंजनआदित्य रॉय कपूर जेव्हा '३डी बोलकी बाहुली' बनतो

आदित्य रॉय कपूर जेव्हा ‘३डी बोलकी बाहुली’ बनतो

Subscribe

फिल्ममेकर अनुराग बासुच्या नुकत्याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या ‘लूडो’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र वाखाणणी होत आहे. या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूरला बोलक्या बाहुल्यांची कला अवगत आहे.

फिल्ममेकर अनुराग बासुच्या नुकत्याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या ‘लूडो’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र वाखाणणी होत आहे. या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूरला शब्दभ्रम आणि बोलक्या बाहुल्यांची कला अवगत असते. या सिनेमात आदित्यची ‘ऑल्टर इगो’ दाखवण्यात आलेली त्याच्यासारखी हुबेहुब दिसणारी बाहुली सुप्रसिद्ध शब्दभ्रमकार रामदास पाध्ये आणि त्यांचा मुलगा सत्यजीत पाध्ये यांनी बनवली आहे. ३डी प्रींटिंग प्रणालीचा उपयोग करून त्यांनी आदित्यसाराखी दिसणारी बाहुली बनवलीय. आदित्य रॉय कपूर आपली स्वत:ची अशा पद्धतीच ३डी बाहुली असलेला पहिला अभिनेता बनला आहे.

‘अनुराग बासु यांना आम्ही हुबेहुब दिसणाऱ्या बाहुल्या बनवू शकतो. याविषयी माहिती होती. ते आमच्याकडे आले असता, आम्ही काही संग्रही असलेल्या बाहुल्या दाखवल्या. तेव्हा त्यातले बारकावे पाहून ते चकित झाले होते’. – रामदास पाध्ये

- Advertisement -

शब्दभ्रम आणि बोलक्या बाहुल्यांच्या कलेत ५३ वर्षांचा गाढा अनुभव असलेल्या रामदास पाध्येंच्या संग्रही २ हजार २०० पेक्षा जास्त बाहुल्या आहेत. वडिलांप्रमाणेच या क्षेत्रात नाव कमावलेले सत्यजित पाध्ये तर इंडियाज गॉट टॅलेंट, ‘केबीसी’, ‘बिग बॉस’ अशा लोकप्रिय शो मध्येही दिसले आहेत.

सत्यजीत सांगतात, ‘आदित्यची ३डी बाहुली बनवताना आम्ही त्याचा ३डी स्कॅन करून घेतला. त्यानंतर आदित्यचे काही ३डी फोटो काढले. आणि मग त्यानुसार, आम्ही फायनल ३डी प्रीटेंड बाहुली तयार केली. आदित्यच्या या बाहुलीचे वैशिष्ठ्य ठेवायचे होते, त्याची हेयरस्टाइल आणि त्याच्या चेहऱ्यावरचे लांबसडक नाक.

- Advertisement -

ही बाहुली बनवल्यावर पुढे होता सर्वात कठीण भाग. तोंडाची ठेवण, भुवया, आणि पापण्या यांची हालचाल करायची होती. मग इथे रामदास पाध्ये यांचा प्रगाढ अनुभव कामी आला. यानंतर आदित्यला सत्यजीतने ट्रेनिंग दिले.


हेही वाचा – नटसम्राट पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -