‘पाताल लोक’ ची निर्माती अनुष्का शर्माला कायदेशीर नोटीस!

Mumbai
पाताल लोक

सध्या वेबसिरीजमध्ये पाताल लोक या वेबसिरीज खूप चर्चा आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माची ही पहिलीवहिली वेबसिरीज आहे. खास करून प्रेक्षकांना या सिरीजमधील पात्र खूप भावली आहेत. पण पुन्हा एकदा ही वेबसिरीज चर्चेत आली आहे. या सीरिजची निर्माती अनुष्का शर्माला कायेदशीर नोटीस बजावण्यात आली आहे. लॉयर गिल्ड मेंबर वीरेन सिंह गुरुंग यांनी ही नोटीस अनुष्काला बजावली आहे.

काय म्हटलं आहे नोटीसमध्ये

जातीवाचक शब्दांचा वापर केल्याचा आरोप या नोटीसीमध्ये करण्यात आला आहे. १८ मे रोजी अनुष्कालाही नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच या शब्दांच्या वापरामुळे नेपाळी समुदायाचा अपमान झाल्याचे म्हटले आहे. या सीरिजच्या दुसऱ्या भागामध्ये एक महिला पोलीस अधिकारी दिसत आहे. ती चौकशीदरम्यान नेपाळी भूमिका साकारलेल्या व्यक्तीचा त्याच्या जातीवरुन उल्लेख करते. केवळ नेपाळी शब्दांचा वापर करण्यात आला असता तर आम्हाला हरकत नव्हती. मात्र त्यानंतर वापरण्यात आलेला शब्द आम्हाला मंजूर नाही. अनुष्का शर्मा या सीरिजची निर्माती असल्यामुळे तिला नोटीस पाठवण्यात आली आहे’ असे गुरुंग यांनी अनुष्काला पाठलेल्या लीगल नोटीसमध्ये म्हटले आहे.

‘पाताल लोक’ ही वेब सीरिज १५ मेला अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित करण्यात आहे. या सीरिजमध्ये जयदीप अल्हावत, गुल पनाग, स्वास्तिका मुखर्जी हे कलाकार आहेत. NH10 आणि उड़ता पंजाबचे लेखक सुदीप शर्मा यांनी या सीरिजची कथा लिहिली आहे. अनुष्काला पाठवण्यात आलेल्या नोटीसवर तिने अद्याप कोणतेही उत्तर दिलेलं नाही.


हे ही वाचा – म्हणून राजस्थान सरकारने योगी सरकरला पाठवलं ३६ लाखांचं बील!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here