घरट्रेंडिंगViral Meme: शाहरुख खानची Signature Pose वापरून पोलिसांनी केली भन्नाट जनजागृती!

Viral Meme: शाहरुख खानची Signature Pose वापरून पोलिसांनी केली भन्नाट जनजागृती!

Subscribe

आसाम पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे ट्विट केले आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार किंग खान शाहरुख खानचे एक मीम सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या मीमला आता आसाम पोलिसांनी ट्विट केले असून, त्यात एक खास संदेशही दिला आहे. या मीमच्या माध्यमातून पोलीस सामाजिक अंतराबाबत (Social Distancing) जनजागृती करत आहेत. या मीमच्या थीमचा योग्य वापर करत पोलिसांनी बाजीगरमधील डायलॉगही शेअर केला असून त्या डायलॉगला पोलिसांनी थोडेसे ट्विस्ट करत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये शाहरुखच्या चेहऱ्यावर एक मास्क फोटोशॉपचा वापर करून लावण्यात आले आहे. तसेच या फोटोमध्ये त्याचे हात कोरोनोव्हायरस साथीच्या दरम्यान एकमेकांपासून अंतर ठेवण्याचा इशारा देत आहेत. या मीमची पंचलाइन अशी आहे की – ‘फक्त इतकेच अंतर ठेवायचे आहे.’ दरम्यान कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी दोन लोकांमध्ये किमान ६ फूट अंतर असणे आवश्यक आहे असे देखील सांगितले जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

आसाम पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, ‘सामाजिक अंतर जीव वाचवू शकते किंवा जसे शाहरुख खानने म्हटल्याप्रमाणे, ”कभी-कभी पास आने के लिए कुछ दूर जाना पड़ता है और दूर जाकर पास आने वाले को बाजीगर कहते हैं.” अर्थात ६ फूट लांब रहा आणि बाजीगर बना, असे देखील या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तर, भारतात गेल्या २४ तासात आतापर्यंतची सर्वाधिक कोरोना रूग्णांत वाढ झाली आहे. देशात काल दिवसभरात ४० हजार ४२५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६८१ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या विक्रमी वाढीनंतर भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा ११ लाख १८ हजार ४३ वर पोहोचला आहे. यामध्ये ३ लाख ९० हजार ४५९ सक्रिय रुग्ण आहेत. याबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


Sushant Suicide: आरोप सिद्ध न झाल्यास ‘पद्मश्री’ परत करणार- कंगना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -