घरमनोरंजन'त्या' गाण्यात मुलीच्या आवाजाने आयुष्मान करतोय चाहत्यांना मंत्रमुग्ध

‘त्या’ गाण्यात मुलीच्या आवाजाने आयुष्मान करतोय चाहत्यांना मंत्रमुग्ध

Subscribe

आयुष्मान खुराना त्याच्या आगामी चित्रपट ‘ड्रीम गर्ल’ मुळे चांगलाच चर्चेत

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्मान खुराना त्याच्या आगामी चित्रपट ‘ड्रीम गर्ल’ मुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने लोकांना आधीच वेडे केले आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर शिवाय दोन गाणे देखील रिलीज झाले आहेत. १५ ऑगस्टला या चित्रपटाचे ‘राधे-राधे’ गाणे रिलीज झाले होते, मात्र आज यातील दूसरे गाणं ‘दिल का टेलीफोन’ रिलीज करण्यात आले आहे.

- Advertisement -

‘दिल का टेलीफोन’ या गाण्यात आयुष्मान पूजा बनून सगळ्यांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळत असून, हे गाणं आयुष्मान पूजा म्हणून महिलेच्या आवाजात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचा आवाज ऐकून फक्त पुरूषच नाही तर एक महिला देखील त्याच्या प्रेमात पडली आहे.

- Advertisement -

‘दिल का टेलीफोन’ या गाण्यात पूजा आपल्या चाहत्यांकरिता गाणं गात आहे. या गाण्याला जोनिता गांधी, नक्श अजीज आणि मीत ब्रदर्स यांनी गायले आहे. कुमारने या गाण्याला लिहीले असून मीत ब्रदर्सनेच या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -