Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन बिग बी ट्रोल, नेटकऱ्यांनी वंशवादावरून सुनावले

बिग बी ट्रोल, नेटकऱ्यांनी वंशवादावरून सुनावले

'आता क्रिकेटमध्येही वंशवाद होणार का?', असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Related Story

- Advertisement -

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी छोट्या चिमुकलीचे आगमन झाले. त्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच्या पोस्टमुळे त्यांना ट्रोलही केले जात आहे. बिग बींनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिलीय ज्यात क्रिकेटर्सची नावे दिली आहेत. महेंद्र सिंह धोनी, हरभजन सिंह, नटराजन, उमेश यादव, मोहम्मद शमी, आर अश्विन, रोहित शर्मा, गौतम गंभीर, सुरेश रैना, ऋद्धिमान साह, रविंद्र जडेजा, अजिंक्य रहाणे या १२ क्रिकेटर्सची नावे आहेत. या १२ क्रिकेटर्सना मुली आहेत. ‘तुमच्या मुलीही क्रिकेट टिमच्या कप्तान होणार का ?’ असे म्हणत बिग बींनी एक पोस्ट शेअर केली आहे.

- Advertisement -

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित करत त्यांना ट्रोल केले आहे. ‘आता क्रिकेटमध्येही वंशवाद होणार का?’, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. ‘ही राष्ट्रिय क्रिकेट टीम आहे. इथे महिला आणि पुरूषांचीच्या टिमचे सिलेक्शन त्यांच्या कुवतीनुसारचं केले जाईल. त्यांच्या आई वडिलांचा यात काही श्रेय नसावे. बॉलिवूडमध्ये सुरू असलेला वंशवाद क्रिकेटमध्ये आणण्याचा प्रयत्न करू नका’, अशी टिका नेटकऱ्यांनी केली आहे. काही नेटकऱ्यांनी बिग बींची बाजू घेतलेली पहायला मिळता आहे. ‘कधी कधी काही गोष्टी या गंमतीशीरित्याही घेतल्या पाहिजेत’, असेही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. त्यांच्या पर्सनल आयुष्यातील अनेक गोष्टी ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. बिग बींचा आगामी सिनेमासाठी ते ३३ डिग्री सेल्सियसमध्ये लडाखमध्ये शुटींग करत होते. त्यावेळीही त्यांचे फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले होते.


- Advertisement -

हेही वाचा – विरुष्काच्या बाळाला भेटण्यासाठी नातेवाईकांनाही ‘No Entry’

 

- Advertisement -