चिमुकल्याची आपल्या मृत आईला उठवण्याची धडपड, व्हिडिओ पाहून किंग खानने केली मदत

Mumbai
bollywood shahrukh khan helps the kid who tried to wake up his dead mother at a station from a viral video
चिमुकल्याची आपल्या मृत आईला उठवण्याची धडपड, व्हिडिओ पाहून किंग खानने केली मदत

काही दिवसांपूर्वी बिहारच्या मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली होती. या व्हिडिओमध्ये एक चिमुरडा त्याच्या मृत आईला उठवण्याचा प्रयत्न करत होता. ही महिला मजूर होती. त्यावेळेस तिच्या मृतदेहावर फक्त एक चादर टाकली होती. तो चिमुरडा आपल्या आईच्या अंगावरची चादर काढून तिला उठवण्याचा प्रयत्न करीत होता.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बॉलिवूडचा किंग खान आणि मीर फाउंडेशनेन या चिमुरड्याला मदत करत आहेत. त्यामुळे त्यांनी या चिमुरड्याला शोधण्यास मदत केलेल्या व्यक्तींचे आभार मानले आहेत. या चिमुरड्याच्या आजी-आजोबांसह फोटो शेअर करून मीर फाउंडेशने असे लिहिले आहे की, या मुलापर्यंत पोहोचण्यास मदत करणाऱ्या सर्वांचे मीर फाउंडेशन आभारी आहे. आता आम्ही त्याला पाठिंबा देत आहोत आणि आता त्याला आजोबा सांभाळत आहेत.

याबद्दल शाहरुखनेही ट्विट केले आहे. त्याने देखील त्या मुलांपर्यंत पोहोचवणाऱ्याचे आभार मानले आहेत. शाहरुख खान आपल्या एनजीओ मीर फाउंडेशन माध्यमातून गरजू लोकांना मदत करते.

शाहरुख खानेचे वडील लहानपणीच सोडून गेले होते. त्याची आई जाऊन ३० वर्ष पूर्ण झाले आहेत. डेव्हीड लेटरमनसोबत एका मुलाखतीत शाहरुखने सांगितले होते की, आई-वडिलांकडून त्याला एकच तक्रार आहे की, त्याने त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालविला नाही.

कोलकाता नाइट राइटर्स, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि रेड चिलीज व्हीएफएक्स या त्यांच्या इतर कंपन्यांच्या माध्यमातून शाहरुख कोरोनाच्या लढ्यात सातत्याने मदत करत आहे. नुकत्याच झालेल्या अम्फान चक्रीवादळानंतर पश्चिम बंगालमधील बाधितांना त्यांनी मदत केली होती.


हेही वाचा – हिंदुस्तानी भाऊने एकता कपूर आणि तिच्या आईविरोधात केला एफआयआर दाखल!