घरमनोरंजनरिटा भादुरी यांचे निधन

रिटा भादुरी यांचे निधन

Subscribe

मालिका आणि सिनेमांमधील त्यांची काम लक्षात राहण्यासारखी आहेत. १९९५साली आलेल्या 'राजा' या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पहिला फिल्मफेयर पुरस्कार मिळाला.

मालिका आणि सिनेमांमधून अभिनयाची छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांचे आज निधन झाले आहे. किडनी फेलमुळे त्या दगावल्या असल्याचे ते कळत आहे. मागील दहा दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील सुजय रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ६२ वर्षांच्या होत्या.

फेसबुकवरुन दिली माहिती

अभिनेते शिशिर वर्मा यांनी रिटा यांच्या निधनाची बातमी फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी रिटा आता या जगात नाही, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. आज दुपारी १२ वाजता त्यांच्या अंधेरी येथील राहत्या घरी अंत्यसंस्कार होणार आहे. ही माहिती देखील त्यांनी दिली आहे.

- Advertisement -

We deeply regret to inform you that Reeta Bhaduri has departed for her journey beyond. The funeral rites will be held on…

Posted by Shishir Sharma on Monday, 16 July 2018

‘राजा’ने दिला फिल्मफेअर

मालिका आणि सिनेमांमधील त्यांची काम लक्षात राहण्यासारखी आहेत. १९९५साली आलेल्या ‘राजा’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पहिला फिल्मफेयर पुरस्कार मिळाला. या शिवाय ‘मै माधुरी दीक्षित बनना चाहती हू’ , ‘क्या कहना’, ‘विरासत’, ‘हिरो नंबर वन’ सारख्या अनेक दर्जेदार चित्रपटात त्यांनी काम केले आहे. सध्या स्टार भारत चॅनेल वर ‘ निमखी मुखींया’  या कार्यक्रमात त्या आजी ची भूमिका साकारत होत्या.त्यांच्या अनपेक्षित एक्सिटमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -