घरमनोरंजन'बॉण्ड 25'चा सेट आगीच्या भक्ष्यस्थानी

‘बॉण्ड 25’चा सेट आगीच्या भक्ष्यस्थानी

Subscribe

स्टंण्टच्या चित्रीकरणादरम्यान 'जेम्स बॉण्ड 25' चित्रपटाच्या लंडन येथील स्टुडिओला आग लागल्याची घटना घडली आहे.

ब्रिटनच्या पाईनवूड स्टुडिओमध्ये आज मंगळवारी स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या आगीत ‘जेम्स बॉण्ड’चा सेट खाक झाला आहे. तर चित्रपटातील एक सदस्य या दुर्घटनेत किरकोळ जखमी झाला आहे. ‘द सन’ या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार एका स्टंण्टच्या चित्रीकरणादरम्यान स्टंण्ट फसल्याने स्टुडिओमध्ये लागोपाठ तीन स्फोट झाले. या घटनेत स्टुडिओचे छत आणि भिंतींच्या काही भागाचे नुकसान झाले आहे.

वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत लंडन पश्चिम येथील स्टुडिओबाहेर उभ्या असलेल्या चित्रपटाच्या स्टाफमधील एक कर्मचारी ढिगाऱ्याखाली गाडला गेला आहे. जेम्स बॉण्डच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर या घटनेबद्दल ट्विट करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आज पाईनवूड स्टुडिओमध्ये ‘बॉण्ड २५’ चित्रपटातील एका नियंत्रीत स्फोटाच्या चित्रीकरणादरम्यान दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सेटवरील कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, स्टुडिओबाहेर असणारा चित्रपटातील एक सदस्य किरकोळ जखमी झाला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, स्टंण्ट दरम्यान लागोपाठ तीन नियंत्रीत स्फोट घडविण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या सेटवरच स्फोटातील आगीच्या गोळ्याने परतणे अपेक्षित होते. पण काहीतरी चुकले आणि आगीचा गोळा स्टुडिओच्या छतातून सरळ बाहेर उडाला. त्यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर दुर्घटनाग्रस्त ठिकाण पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

चित्रपटाला संकटांचे ग्रहण

बॉण्ड २५ चित्रपटाला सुरूवातीपासूनच विविध संकटांनी घेरले आहे. यापूर्वी चित्रपटात बॉण्डची भूमिका साकारणारा अभिनेता डॅनियल क्रेगला जमैकामध्ये चित्रीकरणादरम्यान अपघाताला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी त्याच्या पायावर किरकोळ शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. या चित्रपटात डॅनियल क्रेग सलग ५व्यांदा ब्रिटीश सुपर स्पाय (गुप्तहेराची)ची भूमिका साकारत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -