वाहिन्यांमध्ये वाढली स्पर्धा

Mumbai
Channel Competition

सर्वसाधारणपणे झी आणि कलर्स या मराठी वाहिन्यांमध्ये स्पर्धा होती. त्यात सोनीने मराठीत येऊन आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यात स्टार प्रवाह ही वाहिनी आपल्या पद्धतीने थोडासा प्रेक्षकवर्ग मिळवण्याचा प्रयत्न करत होती. अभिनेते, दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी प्रमुख अधिकारी या नात्याने सूत्रे हाती घेतली आणि स्पर्धा म्हणण्यापेक्षा प्रेक्षकांना आकर्षून घेता येईल अशा गोष्टींना महत्त्व दिले. एक नव्हे, दोन नव्हे तर मार्च, एप्रिल या दरम्यान चार-पाच तरी मालिका तुमच्यापर्यंत पोहोचतील अशी जोरदार तयारी केली आहे. मराठीतून आय पी एल मॅच पहायला मिळेल. मोलकरीन बाई, डॉ. भीमराव आंबेडकर, श्री गुरुदेव दत्त, एक टप्पा आऊट या मालिका लवकरच भेटीला येणार आहेत. 8 एप्रिलपासून जिवलगा ही नवीन मालिका सुरू होत आहे.

रुपेरी पडद्यावरचे स्टार म्हणावेत असे स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर यांच्यासोबत मधुरा देशपांडे या मालिकेत दिसणार आहेत. स्वप्नीलचे बर्‍याच वर्षांनी छोट्या पडद्यावर आगमन होणार आहे. अमृता पहिल्यांदाच दैनंदिनी कार्यक्रमात सहभागी होणार आहे. मराठी मालिकेचा इव्हेंट कितीही मोठा असला तरी पत्रकार परिषदेत कलाकारांच्या सोईसाठी वॅनिटी व्हॅन कधी आणल्याचे स्मरत नाही. मराठी मालिकेच्या बाबतीतसुद्धा हा पहिल्यांदाच प्रयत्न असावा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here