घरमनोरंजन'इनसाइड एज २' चा दमदार ट्रेलर लाँच!

‘इनसाइड एज २’ चा दमदार ट्रेलर लाँच!

Subscribe

ऋचा चड्डा,अंगद बेदी,तनुज विरवानी,सिद्धांत चतुर्वेदी,अमित स्याल आणि सयानी गुप्ता अशी स्टार कास्ट असलेला ‘इनसाइड एज २’ चा बहुप्रतीक्षीत ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आहे. या सिरीजच्या पहिल्या सिझनमध्ये प्रेक्षकांना क्रिकेटमध्ये होणारे राजकारणाची झलक दाखवण्यात आली होती. मात्र दुसऱ्या सीझनमध्ये ट्रेलर बघितल्यावर असं लक्षात येत की क्रिकेटमध्ये होणारे राजकारणाची पोल खोल होणार आहे.

‘इनसाइड एज २’ च्या मुख्य कलकारांमध्ये आमिर बशीर,सपना पब्बी आणि मार्कंड देशपांडे हे कलाकार दिसणार आहेत. एवढच नाही तर पहिल्या सिझनचे दमदार स्टार कास्ट दुसऱ्या सिझनमध्ये देखील आपली जादू दाखवणार आहेत. ऋचा चड्डा, अंगद बेदी, तनुज विरवानी, सिद्धांत चतुर्वेदी, अमित स्याल आणि सयानी गुप्ता सारख्या कलाकारांचा समावेश आहे. यांच्याबरोबर मनु ऋषि चढेली अवराम, जितिन गुलाटी देखील दिसणार आहेत.

- Advertisement -

‘इनसाइड एज २’ चे आकाश भाटिया, करण अंशुमान, गुरमीत सिंह हे दिग्दर्शन करणार आहेत. तर फरहान अख्तर,रितेश सिद्धवानी या सिरीजची निर्मीती करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -