घरमनोरंजनलग्नानंतर कपिल शर्माच्या या कामाचे होत आहे कौतुक

लग्नानंतर कपिल शर्माच्या या कामाचे होत आहे कौतुक

Subscribe

कपिल शर्माचे सध्या सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे. कपिलने त्याच्या लग्न आणि रिसेप्शनमध्ये शिल्लक राहिलेले अन्न फेकून न देता एका एनजीओला दान केले. या एनजीओने हे अन्न गरीबांना वाटले.

कॉमेडी किंग कपिल शर्माने नुकताच गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ हिच्यासोबत जालंधरमध्ये लग्न केले. १२ डिसेंबरला लग्न केल्यानंतर कपिलने १३ डिसेंबरला नातेवाईक आणि मित्र परिवारासाठी रिसेप्शन पार्टी ठेवली. या पार्टीनंतर कपिल शर्माने असे काम केले ज्यामुळे त्याचे सध्या कौतुक होत आहे. कपिलने आपल्या लग्नात आणि रिसेप्शनमध्ये उरलेले अन्न दान केले आहे. उरलेले जेवण फेकून न देता ते जालंधर आणि अमृतसरच्या आसपासच्या परिसरामध्ये वाटण्यात आले. कपिलने केलेल्या पुण्यांच्या कामामुळे त्याचे कौतुक केले जात आहे.


हेही वाचा – कपिल शर्मा – गिन्नीचा विवाहसोहळा संपन्न!

- Advertisement -

 

लग्नापूर्वीच एनजीओने केला संपर्क

दरम्यान, एका एनजीओला कपिलच्या लग्नाबद्दल माहिती मिळाली तर त्यांनी कपिलशी संपर्क केला. त्यांनी कपिलला लग्नामध्ये उरलेले जेवण आमच्या एनजीओला द्या असे सांगितले. हे उरलेले जेवण आम्ही गरीब आणि भूकेल्या लोकांना वाटू असे या एनजीओने सांगितले. कपिलने या संस्थेला लगेच परवानगी दिली. त्याने लग्नाच्या वेगवेगळ्या विधीमध्ये उरलेले जेवण या एनजीओला दान केले.

- Advertisement -

कपीलने निर्माण केला आदर्श

कपीलने अशा पध्दतीने लग्नामध्ये उरलेले जेवण आमच्या एनजीओला देऊन एक आदर्श निर्माण केले असल्याचे मत एनजीओच्या अध्यक्षांनी व्यक्त केले. कपिलने केलेले कार्य लोकांनी समजून घ्यावे आणि त्यांनी देखील त्यांच्या लग्नामध्ये उरलेले जेवण फेकून न देता ते गरीबांना दान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -