घरट्रेंडिंग'या' गायिकेची पर्स पाहून व्हाल थक्क

‘या’ गायिकेची पर्स पाहून व्हाल थक्क

Subscribe

कधी कोणती गोष्ट चर्चेत येईल हे सांगता येत नाही. अमेरिकन गायिका लिजो हिच्यासोबत असचं काहीस झालं आहे. लिजो ही सध्या चर्चेत आली आहे. लिजो ही तिच्या गाण्यांमुळे चर्चेत असेतचं मात्र आता ती वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्स दरम्यान लिजोच्या व्हेलेंटिनो मायक्रो पर्सची चर्चा सध्या रंगली आहे. तिची ही मायक्रो पर्स अक्षरश: एका बोटा एवढी आहे. त्यामुळे लिजोची ही मायक्रो पर्स चांगलीच चर्चेत आली आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षभरातच लिजो ही तिच्या ‘ट्रुथ हर्ट्स’ या गाण्यामुळे प्रसिद्ध झाली आहे. बिलबोर्ड हॉट १०० मध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

- Advertisement -

रविवारी संध्याकाळी म्युझिक अवॉर्ड्समधील रेड कार्पेटवर लिजो एका वेगळा लूकमध्ये दिसून आली. या म्युझिक अवॉर्डमध्ये लिजोला तीन नामांकन मिळाली होती. त्यामध्ये न्यू आर्टिस्ट ऑफ द इयरचा समावेश होता.

या ३१ वर्षीय अमेरीकन या गायिकेने एक नारंगी रंगाचा रफल ड्रेस घातला आहे. त्यासह तिने पांढऱ्या रंगाची स्टिलेटो सॅंडल घातली आहे.

तसंच तिने पांढऱ्या रंगाचे कानातले आणि हिऱ्याची अंगठी घातली होती. तिने ६० च्या दशकातील हेअर स्टाईल केली होती असून लिजोने नेल आर्ट देखील केले होते. लिजोचा हा पेहराव जरी घायाळ करणारा असला तरी तिच्या मायक्रो पर्सने लक्ष वेधून घेतले.


हेही वाचा – #WeAre420; आमदारांच्या आकड्यांवरून मजेदार ट्विट ट्रोल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -