घरमनोरंजन'बॉईज २'चा धम्माल ट्रेलर लाँच!

‘बॉईज २’चा धम्माल ट्रेलर लाँच!

Subscribe

'बॉईज' चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. चित्रपटात तरुणांची धम्माल, मस्ती प्रेक्षकांनी अनुभवली.आता पुन्हा हीच धम्माल प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 'बॉईज' चित्रपटाचा सिक्वल 'बॉईज २' प्रदर्शित होणार आहे.

सध्या ‘बॉईज’ सिनेमाचा सिक्वेल येतोय म्हटल्यावर सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. ‘बॉईज’ चित्रपटाप्रमाणे ‘बॉईज २’ मध्ये काय काय धमाल अनुभवता येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. आणि त्यातच ‘बॉईज२’चा ट्रेलर लाँच झाला आणि प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली. ‘बॉईज२’ चित्रपटात तरूणाईची मस्ती, धम्माल बघायला मिळणार आहे. येत्या ५ ऑक्टोबरला बॉईज २ची मस्ती अनुभवता येणार आहे.

Boyz 2
‘बॉईज २’चे कलाकार

कसा असेल ‘बॉईज २’?

शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात पाऊल टाकणाऱ्या धैर्या, ढुंग्या आणि कबीरची युथफुल गोष्ट या ट्रेलरमध्ये बघायला मिळाली. महाविद्यालयीन तरुणांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये प्रेम आणि रोमान्स जरी दिसून येत असला तरी, आपापसांतील वैर, गटपद्धती आणि त्यांच्यातील वादविवाद देखील आपल्याला पाहायला मिळतो. शिवाय ओंकार भोजणे, सोहम काळोखे, सायली पाटील, शुभांगी तांबळे आणि अक्षता पाडगावकर हे नवीन चेहरेदेखील या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. या नवोदित कलाकारांसोबतच यतीन कार्येकर, गिरीश कुलकर्णी आणि पल्लवी पाटील या प्रसिद्ध कलाकारांच्या देखील यात प्रमुख भूमिका आहेत.

- Advertisement -

असा सुचला बॉईज २!

विशाल देवरुखकर यांनी ‘बॉईज २’चं दिग्दर्शन केलं आहे. ‘बॉईज’च्या सिक्वलसाठी तितकाच ताकदीचा विषय निवडणंदेखील गरजेचं होतं, त्यासाठी तोडीस तोड अशा विषयाच्या शोधात मी आणि ऋषिकेश कोळी होतो. परंतु, चार-पाच महिने होऊनदेखील आम्हाला काहीच सुचत नव्हतं. मात्र, एकदा अचानक माझा फोन बंद झाला आणि त्यातूनच ‘बॉईज २’ ची गोष्ट आम्हाला सापडली’, असं विशाल देवरुखकर यांनी  सांगितलं. अवघ्या दोन तीन तासांसाठीच बंद पडलेल्या फोनमुळे जर मी इतका अस्वस्थ होत असेल तर कॉलेज तरुणांसाठी त्यांचा फोन किती महत्वाचा असेल? असा प्रश्न मला पडला. मी लगेचच हा विचार ऋषिकेश कोळीला बोलून दाखवला. ऋषिकेशने देखील त्याला पसंती देत ‘बॉईज २’चं लिखाण सुरु केलं. अशा या अनावधाने सुचलेल्या ‘बॉईज २’ चित्रपटामध्ये शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या ‘बॉईज’ची धम्माल पाहायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -