सुभाष घई निर्दोष; केट शर्माने तक्रार घेतली मागे

केट शर्माने केलेल्या आरोपामध्ये काही तथ्य न आढळल्यामुळे शेवटी हे प्रकरण बंद करण्यात आले. सुभाष घई यांच्यावर आरोप फक्त बदनामी करण्यासाठी लावण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai
Subhash Ghai and kate sharma
सुभाष घई आणि केट शर्मा

मी-टू प्रकरणात अडकलेल्या निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांना अखेर दिलासा मिळाला आहे. अभिनेत्री केट शर्माने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. याप्रकरणात पोलिसांनी त्यांना क्लीन चीट दिली असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र याप्रकरणी डीसीपी परमजीत दहिया यांनी सांगितले की, सुभाष घईला क्लीन चीट मिळाली नाही तर केट शर्माने स्वत: तक्रार मागे घेतली आहे. केट शर्माने सुभाष घई यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

केटनेच तक्रार मागे घेतली

पोलिसांनी याप्रकरणात सुभाष घई यांना क्लीन चीट दिली अशा चर्चा रंगत होत्या. मात्र यावर डीसीपींनी स्पष्टीकरण दिले की, तक्रारकर्त्यानी जर आपली तक्रार मागे घतली असेल तर क्लीन चीट किंवा क्लोजर रिपोर्टची गोष्ट येतच नाही. केट शर्माने केलेल्या आरोपामध्ये काही तथ्य न आढळल्यामुळे शेवटी हे प्रकरण बंद करण्यात आले. पोलिसांनी असेही सांगितले होती की, सुभाष घई यांच्यावर आरोप फक्त बदनामी करण्यासाठी लावण्यात आले होते.

फेसबुकवर अपलोड केले होते फोटो

केट शर्माचे जे फोटो सुभाष घई यांच्यसोबत व्हायरल होत होते. ते सुभाष घई यांच्या वाढदिवसाच्या दिवशीचे होते. तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये केट शर्मा देखील उपस्थित होती. याच फोटोचा फायदा घेत केट शर्माने फेसबुकवर अपलोड करत हे आरोप केले होते. त्यानंतर आपल्या आईच्या आजारपणाचे कारण देत तिने तक्रार मागे घेतली. पोलिसांना या आरोपांमध्ये तथ्य न आढळल्याने त्यांनी ही केस बंद केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here