घरताज्या घडामोडीSushant Sucide Case: बिहारच्या IPS अधिकाऱ्याच्या होम क्वारंटाईन निषेधार्थ भाजप आक्रमक

Sushant Sucide Case: बिहारच्या IPS अधिकाऱ्याच्या होम क्वारंटाईन निषेधार्थ भाजप आक्रमक

Subscribe

भाजपचं आंदोलन तर अजित पवारांची आयुक्तांबरोबर चर्चा

अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला दररोज नवीन वळण मिळत आहे. आता या प्रकरणाच्या तपासावरून राजकारण सुरू झालं आहे. बिहारच्या IPS अधिकाऱ्याला होम क्वारंटाईन केल्याच्या निषेधार्थ मुंबईच्या आयुक्तालयासमोर भाजपने आंदोलन केलं. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेट दिल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी बिहार पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलीस विरूध्द बिहार पोलीस असा नवा वाद सुरू झाला आहे. त्यात आता सुशांतच्या आत्महत्येची चौकशी करायला मुंबईत पोहचलेल्या IPS अधिकाऱ्याला मुंबई महापालिकेने होम क्वारंटाईनचा शिक्का मारला आहे. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडण्यास बंदी घातली आहे. या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाली आहे. मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी कोणाच्या आदेशावरून बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन व्हायला सांगितलं हे स्पष्ट करा, अशी भाजप नगरसेवकांची मागणी आहे. दररोज मुंबईत हजारो लोक वैध- अवैध मार्गाने येतात. त्या सगळ्यांना क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी का बसवलं जात नाही, असा भाजपचा सवाल आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आयुक्तांची भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची भेट घेतली.मंत्रालयात अजित पवार यांच्या दालनातच पोलीस आय़ुक्तांनी सुमारे २० मिनिटं त्यांच्याशी चर्चा केली. नेमकी कशासाठी भेट घेतली याचं कारण परमबीर सिंग यांनी किंवा मुंबई पोलिसांनी स्पष्ट केललं नाही.


हे ही वाचा – नोकरीची सुवर्ण संधी! देशात २२ विदेशी कंपन्याचा प्रस्ताव, १२ लाख लोकांना मिळणार रोजगार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -