घरमनोरंजनमला अंधाराची भीती वाटते - प्रियदर्शन जाधव

मला अंधाराची भीती वाटते – प्रियदर्शन जाधव

Subscribe

अभिनेता प्रियदर्शन जाधव या अंधारीची भीती वाटते असे मत व्यक्त केले आहे.

प्रत्येक व्यक्तीला कशाची ना कशाची तरी भीती वाटत असते. मग ती सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा एखादा अभिनेता असो. मनुष्य स्वभावाप्रमाणे प्रत्येकाला भीती वाटणे साहजिकच आहे. अशीच एका गोष्टीची भीती वाटत असल्याचे मत अभिनेता प्रियदर्शन जाधव यांनी व्यक्त केले आहे. प्रियदर्शन जाधवला अंधाराची भीती वाटते असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

असे म्हणाला प्रियदर्शन

‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या सिनेमाचे चित्रीकरण भोर येथे करण्यात आले होते. या सिनेमात काही भुताची दृश्य चित्रित करण्यात येणार होती. त्यामुळे सेटवर अंधार करण्यात आला होता. या अंधाराची त्याला भीती वाटत होती. अशा वातावरणात चित्रीकरण करताना प्रियदर्शन बराच दचकत होता. त्यामुळे मला ही अंधाराची भीती वाटते असे मत अभिनेता प्रियदर्शन जाधव यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

‘माझ्या बायकोचा प्रियकर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

‘माझ्या बायकोचा प्रियकर’ हा सिनेमा येत्या २३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राजीव एस.रुईया हे सिनेमाचे दिग्दर्शक असून दीपक रुईया, राजेंद्र गोयंका, प्रदीप के शर्मा, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा, अक्षय जंयतीलाल गाडा हे निर्माते आहेत. तर रेश्मा कडाकिया, कौशल कांतीलाल गाडा, निरज गाडा हे सहनिर्माते आहेत. तसेच विवेक कर, राजू सरदार व प्रभाकर नरवडे यांचे संगीत या सिनेमाला लाभले आहे.


पहा – बायकोचा अनोखा प्रियकर

- Advertisement -


पहा – भारत गणेशपूरे ‘या’ चित्रपटात करणार धम्माल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -