प्रियांका – निक जोधपूरहून झाले रवाना

महिन्याच्या सुरुवातीलाच लग्नगाठ बांधलेल्या प्रियांका आणि निक या जोडीने लग्नस्थळ असलेलं जोधपूर आज सोडलं आहे. त्यानिमित्ताचे देसी गर्लचा लग्नानंतरचा फर्स्ट लूक तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.

Mumbai
priyanka and nick
प्रियांका - निक

महिन्याच्या सुरुवातीलाच लग्नगाठ बांधलेल्या प्रियांका आणि निक या जोडीने लग्नस्थळ असलेलं जोधपूर आज सोडलं आहे. त्यानिमित्ताचे देसी गर्लचा लग्नानंतरचा फर्स्ट लूक तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा शाही विवाह सोहळा राजस्थानच्या जोधपूर येथील उमेद भवन येथे संपन्न झाला. १ आणि २ डिसेंबर रोजी त्यांचे दोन पद्धतीने लग्न पार पडले. पहिल्या दिवशी ख्रिश्चन तर दुसऱ्या दिवशी पंजाबी पारंपारीक पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर आज, सोमवारी त्यांना जोधपूर विमानतळावर स्पॉट करण्यात आले. यावेळी प्रियांका हिरवी साडी, हातात लाल रंगाचा चुडा आणि निक खाकी रंगाच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळाला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here