आर के स्टुडिओची बॉलिवुडमध्ये नव्याने एन्ट्री

नवीन सिनेमा एका लव्हस्टोरी वर आधारित

RK Studio re enter in bollywood
आर के स्टुडिओची बॉलिवुडमध्ये नव्याने एन्ट्री

बॉलिवुडच्या सुवर्ण काळाचा साक्षीदार असलेला आर के स्टुडिओ आता नव्या रूपात पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. याची माहिती स्वतः रणधीर कपूर यांनी दिली आहे. १९४८ साली मुंबईच्या चेंबूर येथे आरके स्टुडिओची स्थापना झाली. अभिनेते राज कपूर यांनी आरके स्टुडिओची स्थापना केली होती. काही दिवसांपूर्वी आरके स्टुडिओज हा गोदरेज कंपनीला विकण्यात आला आहे अशी चर्चा चालू होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कपूर कुटुंबियांची गोदरेज कंपनीसोबत स्टुडिओच्या जागेविषयी चर्चा चालू होती. मात्र आता आरके स्टुडिओ पुन्हा एकदा सुरू होत आहे असं स्व:ता रणधीर कपूर यांनी सांगितलं आहे.

ई टाईम्स दिलेल्या माहितीनुसार, आरके फिल्म आता पुन्हा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आम्ही नवीन सिनेमे साकारण्याच्या विचारात आहोत. आमचा नवीन सिनेमा हा एका लव्हस्टोरी वर आधारित आहे. अद्याप सिनेमातील कलाकारांची नावे घोषित करणार नाही. पण काही दिवसांतच सिनेमातील कलाकारांची घोषणा करू असं अभिनेते रणधीर कपूर यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर आरके फिल्मच्या अंतर्गत तयार होणाऱ्या नव्या सिनेमांची जवाबदारी स्वतः रणधीर कपूर यांनी घेतली आहे.

काही वर्षांपूर्वी आरके स्टुडिओला भीषण आग लागली होती. या आगीमुळे आरके स्टुडिओजच खुप मोठ नुकसान झालं होतं. आरके स्टुडिओ मधून अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या करिअर सुरूवात केली. आरके फिल्म मध्ये काम करून अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली. मेरा नाम जोकर, बॉबी, सत्यम शिवम सुंदरम, राम तेरी गंगा मेरी, आवारा, श्री ४२० अशा अनेक सिनेमांच चित्रीकरण आरके स्टुडिओमध्ये करण्यात आलं होत.


हेहि वाचा – बॉलीवूड एकवटले! ‘या’ बड्या मीडिया हाऊसेस विरोधात कोर्टात याचिका दाखल