घरमनोरंजनदिलदार सलमान खान

दिलदार सलमान खान

Subscribe

काही दिवसांपूर्वीच ‘दस का दम’चा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. या भागात एका स्पर्धकानेच अभिनेता सलमान खानवर गुगली टाकल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सलमानने दिलेल्या उत्तरामुळे हा भाग फार गाजला होता. मात्र आता हा शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
छोट्या पडद्यावर सलमानचा ‘दस का दम’ शोचा तिसरा सिझन सुरू झाला आहे. अभिनयाव्यतिरिक्त दिलदार व्यक्ती म्हणून सलमान प्रसिद्ध आहेच. कायम अडचणीत असलेल्यांसाठी सलमानने मदतीचा हात पुढे केल्याची अनेक उदाहरणं आहेत. सलमानच्या याच स्वभावाचा अनुभव पुन्हा एकदा आला असून, यावेळी त्याने एका लहान मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे.
या शोच्या दुसऱ्या भागात कोलकाताच्या पिंकी शाह या महिलेने भाग घेतला होता. मात्र ती या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकली नाही. अर्ध्यातच तिला हा शो सोडावा लागला. तिला केवळ २० हजार रुपयेच जिंकता आले. पिंकीला या शोमधून माघार घ्यावी लागल्यामुळे तिला शोच्या सेटवरच रडू कोसळले. पिंकी रडायला लागल्यावर सलमानने पिंकीला त्याचे कारण विचारल्यावर तिला मुलीच्या शिक्षणाची चिंता असल्याचे तिने सांगितले. यावर तोडगा काढत तिच्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्यास तयार असल्याचे सलमानने सांगितले.
‘यापुढे मुलीच्या शिक्षणाची काळजी करण्याची गरज नाही. तिला जितकं शिकायचं आहे तितकं शिकू दे. तिच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च मी स्वत: उचलेन’, असं सलमानने सांगितलं. सलमानच्या या आश्वासनानंतर पिंकीला रडू कोसळले आणि तिने सलमानचे आभार मानले
पिंकीच्या घरची परिस्थिती बेताची असून, ती एका खासगी कंपनीत काम करते. मात्र मासिक वेतन कमी असल्यामुळे तिला घरखर्च चालविणे अवघड जाते. यातच तिच्या डोक्यावर मुलीच्या शिक्षणाचा भार आहे. मुलीला चांगले शिक्षण देता यावे, यासाठी पिंकी दिवसरात्र मेहनत करत असते. मात्र आर्थिक समस्यांमुळे ग्रासलेल्या पिंकीला यातून मार्ग काढता येत नव्हता. यासाठी तिने ‘दस का दम’ या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -