घरमनोरंजनटीना दत्ताच्या विनयभंगाच्या आरोपावरून यु टर्न

टीना दत्ताच्या विनयभंगाच्या आरोपावरून यु टर्न

Subscribe

छोट्या पडद्यावरील कलाकार टीना दत्ता हिने तिचा सहकलाकार मोहित मल्होत्रा याच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. मात्र आता तिने आपल्या आरोपावरून यु टर्न घेत मोहितसोबत नव्याने सुरुवात करत असल्याचे म्हटले आहे.

छोट्या पडद्यावरील कलाकार टीना दत्ता हिने तिचा सहकलाकार मोहित मल्होत्रा याच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. मात्र आता तिने आपल्या आरोपावरून यु टर्न घेत मोहितसोबत नव्याने सुरुवात करत असल्याचे म्हटले आहे. अभिनेता मोहित मल्होत्रा याने आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता. परंतू आता ते सगळ विसरून नव्याने सुरुवात करणार असल्याचे टीना दत्ताने सांगितले आहे.

अनेकदा मोहितला केले सावध 

मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान मोहितने आपला विनयभंग केल्याची माहिती टीनाने दिल्यानंतर ही बातमी मालिका जगतात वाऱ्यासारखी पसरली. इतकेच नव्हे तर त्यांचा शो बंद होणार असल्याच्या बातम्या देखील येऊ लागल्या होत्या. मात्र आता टीनाने मोहितसोबत चर्चा करून सामंजस्याने हे प्रकरण मिटवलं आहे. टीनाने मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान मोहितच्या गैरवर्तणुकीबाबत अनेकदा त्याला सांगितले होते. एकदा तर तिने या घटनेवरून सेटवर गदारोळही माजवला होता. त्यामुळे संपूर्ण सेटवरील वातावरण गढूळ झाले होते. मात्र मोहितने स्पष्टीकरण देताना ती केवळ अभिनयाची गरज असल्यामुळे आपण तसे करत असल्याचे म्हटले होते.

- Advertisement -

मीटू मोहिमेत टीनाचं नाव

यापूर्वीही अनेक अभिनेत्रींनी मीटू मोहिमेंतर्गत पुरुषांवर विनयभंगाचा आरोप केला आहे. तर काहींनी हा आरोप मागे देखील घेतला आहे. त्यातच आता टीना दत्ता यांचेही नाव सामील झाले आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकर यांच्या केलेल्या गंभीर आरोपानंतर मीटूची मोहिम सुरु झाली होती. यासंबंधी कित्येकांवर पोलिसात गुन्हेदेखील दाखल झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -