घरफिचर्सकार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर

Subscribe

पनवेल तालुका आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यात आपल्या धडाकेबाज कार्याची छाप पाडणारे कार्यसम्राट आमदार म्हणजे पनवेल विधानसभा क्षेत्रातील भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर होय. आमदार प्रशांत ठाकूर हे भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत.

पनवेल तालुक्यात शेकापला अपयश येण्याचे मुख्य कारण म्हणजे लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे मुत्सद्दी राजकारण. रामशेठ यांच्या तालमीत तयार झालेले आमदार प्रशांत ठाकूर व्यक्तिमत्व आहे. पनवेल, उरण आणि रायगड जिल्ह्यातील एक भारदस्त व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर होय. त्यांच्या भोवतालीच पनवेलचे राजकारण फिरते. रामशेठ यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमय असलेले पनवेल भाजपमय झाले. प्रशांत ठाकूर हे दुसर्‍यांदा भाजपमधून आमदार म्हणून निवडून आले.

- Advertisement -

पनवेल विधानसभा क्षेत्रात काम करताना सिडको, पनवेल महापालिका आणि शासनाच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली. पनवेलच्या विकासासाठी महानगरपालिका आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. पनवेल ही रायगड जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका ठरली. तिला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.

सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांचे योगदान मोठे आहे. कोरोनाच्या काळातील प्रशांत ठाकूर यांचे योगदान महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या संकटात एक योद्धा म्हणून मागील पाच महिने लढत आहेत. लॉकडाऊनच्या परिस्थितीत गरीब, गरजू आणि झोपडपट्टीत, फुटपाथवर राहणार्‍या कुटुंबांचे मोठे हाल झाले. इतर राज्यातील मजूर अडकले. या सर्वांवर उपासमारीची वेळ आली.

- Advertisement -

अखेर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्यासाठी धाव घेतली. कोरोनाच्या काळात तब्बल दोन महिने सातत्याने पनवेलमध्ये मोदी किचनच्या माध्यमातून गरीब व गरजूंना अन्न वाटप करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांचे सामाजिक दायित्व असेच सुरू राहो, त्यांचा राजकीय प्रवास अखंड यशस्वी राहो, हीच त्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -