घरफिचर्सनापणे- शेर्पे धबधबा

नापणे- शेर्पे धबधबा

Subscribe

गावांमध्ये तुम्ही थांबलात आणि विचारलत की दादा धबधब्याकडे कसं जायचं? तर, हयसन पुढे गेलास की उजवीकडच्या घाटीनं सरळ वर जावा अशी माहिती तुम्हाला दिली जाते. त्यात तो मालवणी बाज आलाच.

चला धबधब्यावर जाऊया!! कणकवली तालुक्यातील नापणे – शेर्पे या गावांच्या सीमेवर असलेला हा धबधबा. मन अगदी प्रसन्न होतं. ऋतुमानानुसार पर्यटकांची गर्दी देखील दिवसेंदिवस वाढताना दिसते. बारमाही वाहणारा हा धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे. मनाला मिळणारी शांती आणि धम्माल मस्ती करायची असेल तर नापणे – शेर्पे धबधब्याला एकदा भेट द्यायला काहीच हरकत नाही.

सुखनदीच्या उगमस्थानापासून केवळ काही अंतरावर हा धबधबा सुरू होतो. मज्जा, मस्ती आणि धम्माल करण्यासाठी बारमाही उपलब्ध असलेला हा किमान कणकवली तालुक्यातील एकमेव धबधबा असावा. तसे पाहता धबधब्याचे दोन भाग पडतात एक वरचा धबधबा आणि एक खालचा धबधबा. धबधब्यावर जाताना खालच्या धबधब्यात जाऊ नका अशी तंबी घरून मिळते. शिवाय, पर्यटकांनी देखील त्या ठिकाणी जाऊ नयेत अशा सुचना फलक लावलेला आहे.

- Advertisement -

मुंबई – गोवा हायवेपासून किमान १० किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. हायवेवर असलेल्या नडगिवे गावातील फाट्यावरून आत गेल्यानंतर कुरंगवणे, शेर्पे गावामधून हा रस्ता जातो. जर या गावांमध्ये तुम्ही थांबलात आणि विचारलंत की दादा धबधब्याकडे कसं जायचं? तर, हयसन पुढे गेलास की उजवीकडच्या घाटीन सरळ वर जावा’ अशी माहिती तुम्हाला दिली जाते. त्यात तो मालवाणी बाज आलाच. प्रवास करताना गावाकडचे रस्ते नेमके कसे असावेत याची देखील प्रचिती येते.

पण हो! धबधब्यावर गेल्यावर जास्त उतावीळ होऊ नका. तिथे दिलेल्या सुचनांचं पालन करा. कारण खालचा धबधबा अर्थात स्थानिक भाषेत त्याला वझर देखील म्हणतात. त्या ठिकाणी जाण्याचा मोह टाळा. कारण खोलीचा अंदाज न आल्यानं शिवाय स्थानिकांच्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्याने काही पर्यटकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. ते म्हणतात ना आग आणि पाण्याशी खेळू नका. तुम्ही तिथे राहण्याचा प्लॅन करत असाल तर तिथे राहण्यासाठी अगदी माफक दरात हॉटेल देखील उपलब्ध आहे. अस्सल कोकणी पद्धतीचे जेवण आणि थंडगार वातावरण. आहा! मजा काही औरच. शिवाय काही मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झाल्याने धबधबा देखील नावारूपाला आला. काय मग बॅग भरताय ना? नापणे – शेर्पे धबधब्यावर मजा करायला.

- Advertisement -

– चारुशिला शेलार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -