घरफिचर्सरंगभूमीवर ‘राजगती’ राजकारणाच्या सकारात्मकतेवर नाटकातून प्रकाशझोत

रंगभूमीवर ‘राजगती’ राजकारणाच्या सकारात्मकतेवर नाटकातून प्रकाशझोत

Subscribe

रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक ‘राजगती’ हे राजकारणाची नवी परिभाषा सांगते. भारद्वाज म्हणतात, राजकारणाची आपण आतापर्यंत पाहत आलो त्यातली खरी दृष्टी कोणती? हा प्रश्न मी स्वतः सोबत आपणा सर्वांनाही नाटकातून विचारत आहे. राजकारणात आजपर्यंत आपण पाहिली ती राजकीय नेत्यांची मोठमोठी भाषणे, एकमेकांवर कुरघोडी, पक्षांची-अपक्षांची नीती-अनिती, त्यातून होणारे जनतेचे शोषण, बोकाळलेला भ्रष्टाचार या सगळ्यात राजकारणाचे उद्दीष्ट, सकारात्मक अशी खरी बाजू कुठेतरी हरवून जाते. समांतर रंगभूमीच्या चळवळीतील राजगती हे नाटक हेच अधोरेखित करणारा महत्वाचा टप्पा आहे. 23 जानेवारी 2019 रोजी रात्री 8.00 वाजता दादरच्या शिवाजी नाट्य मंदिरात या नाटकाचा प्रयोग होणार आहे.

माझं हेच मत होतं की, राजकारण वाईट आहे, चांगले लोक त्यात जात नाहीत. मी आणि माझा परिवार इथपर्यंतच विचार करण्याची त्यांची मजल, समाजाप्रती माझी काय जबाबदारी आहे, याची जाणीव नाही.

देशात – समाजात घडणार्‍या घटनांवर केवळ आरोप करता येतात पण त्यात प्रत्यक्ष सहभागी नाही होत किंवा व्यवस्थेत उतरून त्यात बदल नाही करत. आज कालचे राजकारणी लोक तात्कालिक फायद्यासाठी जमाव निर्माण करतात आणि त्या जमावाला दिशा न देता दिशाहीन करतात. आणि विचारवंत विकल्प नाही! याचा शोक व्यक्त करत हातावर हात धरून बसतात. म्हणून आम्हीच विकल्प आहोत.

- Advertisement -

राजगति नाटकाच्या प्रक्रियेने माझा दृष्टिकोन बदलला की, राजनीती ही नीती आहे, अशी नीती जी माझ्या जन्मापासून माझ्या मृत्यू पर्यंत च्या जीवन प्रणालीत माझ्या साठी अशी व्यवस्था निर्माण करते आहे जिथे मी व्यक्ती म्हणून जगते, ती कशी वाईट असू शकते.

आपला देश कुठल्या पक्षाच्या तत्वावर नाही तर आपल्या संविधानाच्या मूल्यांवर चालतो … आणि संवैधानिक मूल्यांची जास्तीत जास्त अंमलबजावणी होणे गरजेचे आहे… खुर्चीवर बसलेल्या प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार असतो या अधिकारासोबत जबाबदारीची जाणीव महत्वाची … ही जाणीव करून देण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे … हे तेव्हाच शक्य होईल ज्यावेळी प्रत्येक सामान्य नागरिक राजनीति मध्ये सक्रिय सहभाग घेईल…

- Advertisement -

आपल्या भारतीय कालघटनेत राजनैतिक चरित्र जन्माला आले …या चरित्रां बद्दल ऐकणे आणि समजून घेणे यात फरक आहे .. यांचे विचार आणि आपली कृती यातली तफावत भरून काढणे गरजेचे आहे … आपल्या राजनैतिक व्यवस्थे मध्ये गांधी, आंबेडकर, भगतसिंग, कार्लमार्क्स यांचा अविभाज्य भाग आहे ..यांच्याबद्दल अनेक समज आणि गैरसमज समाजात रूढ आहेत… त्यांना समजून त्यावर सद् विवेक बुद्धीने विचार करणे गरजेचे आहे. राजनीती ही प्रत्येक व्यक्तीची नीती आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने त्यात सहभाग घेऊन आपला आतला आवाज ऐकण्याचा शोध घ्यावा, तेव्हाच या राजनीती मधील पावित्र्य आणि सात्विकता समजता येते. ’राजगति’ या नाटकामध्ये राजनीतिची पवित्र आणि अध्यात्मिक बाजू स्पष्ट होते. राजगती चे चार मुख्य भाग आहेत .. सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीती. आपण सगळा दोष फक्त राजनीतीला देतो …पण राजनैतिक चरित्र कसे असावे यावर मंथन करत नाही … व्यवस्था जी वर्षोनुवर्षे बदलत नाही मग सत्ता कोणाचीही असो व्यवस्था आपल्यातच मार्गस्थ असते. अशावेळी व्यवस्था चालवणार्‍या व्यक्तीची भूमिका काय असावी?

आज आपले विश्व जागतिकीकरणाने जवळ आले आहे. विश्व खुले झाले आहे. पण या खुलेपणाला स्वीकारण्याची जबाबदारी, नितीगत मार्गाची स्वीकार्हता आपल्याकडे आहे का ? या जागतिकीकरणाने माणसाचा विकास घडवला की त्याला अधोगती कडे नेले? व्यावहारिक सुख दिले पण मानसिक शांतता हरवली, मग नेमके आपण काय करतोय ? 1990 नंतर थढज उदारमतवादी आणि जागतिकीकरणाने जगाची उलथापालथ केली. माणूस हा माणूस न राहता वस्तू बनून खरेदी विक्रीच्या जाळ्यात अडकला. त्याला किती फायदा आणि किती तोटा एवढीच भाषा उरली. यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका राजकारणाची आहे.

जागतिकीकरणाचा अर्थ आहे मानवतेचे ’वस्तुकरण’. मानवी उत्क्रांतीचा सर्वात विध्वंसक असा हा काळ आहे . जागतिकीकरणही आतापर्यंत ’माणूस’ बनण्याच्या प्रयत्नाची लढाई होती. माणसातल्या पशुत्वाशी त्याची लढाई आजपर्यंत सुरू होती. पण 1991 नंतर एक उलटा काळ सुरू झाला. मानवाने जेवढी ’माणुसकी’ साध्य केली तिला एक ’प्रॉडक्ट’ करून नफा कमावण्याचा काळ सुरू झाला. त्याचेच नाव आहे ’जागतिकीकरण’ आहे.

राजगती हे नाटक सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीती’च्या गतीवर भाष्य करते. हे नाटक ‘माझे राजनीतीशी घेणं देणं काय ?’ हा विचार मोडण्याचं काम करते. सामान्य लोक हे लोकशाही चे पहारेकरी असतात, हे सांगण्याचं काम हे नाटक करतं. संविधानिक व्यवस्था निर्मितीचा आग्रह हे नाटक करते. आत्महिनतेला नकार देऊन आत्मबळाचा विचार या नाटकात आहे. आपण नागरिक म्हणून आपले मत देतो, मात्र एवढीच आपली जबाबदारी नाही. त्यानंतर परिस्थितीतीला दोष देत आपणत्यातून आपले अंग काढून घेतो आणि राजकारणाला दोष देतो. मात्र, राजकीय प्रक्रियेविना जगातील लोकशाही चालू शकेल का? त्यामुळे नागरिकांची ही जबाबदारी असते की त्यांनी राजकीय प्रक्रियेपासून अलिप्त राहाता कामा नये. संविधानाने आपल्याला देशाचे मालक बनवले आहे. आणि आपण भिकारी बनून का राहतो? हा सडेतोड प्रश्न या नाटकात आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व, मानवता या मूल्यांची लोकशाहीतील जबाबदारी काय आहे. यावर राजगती हे नाटक भाष्य करते.

समांतर रंगभूमीचा संघर्ष हा फॅसीझमशी सातत्याने सुरू आहे. स्वराज्य आणि समतेच्या विरोधात फॅसीस्ट शक्ती डोके वर काढत आहेत. त्यातून हिंसेला खतपाणी मिळत आहे. या फॅसीस्ट शक्तींमुळे संस्कृती, अभिव्यक्ती, साहित्य, रंगमंच, कला अशा सर्वच घटकांवर नकारात्मक परिणाम होत आहे. हा प्रकार इथेच रोखण्यासाठी ‘सांस्कृतिक आंदोलनाची’ गरज आहे ! त्यासाठी समांतर रंगभूमीची चळवळीला उभारी देण्याची गरज आहे. मागील 26 वर्षांपासून सरकारी, निमसरकारी किंवा खासगी अनुदान, देणगीशिवाय आम्ही हे रंगभूमीचे आंदोलन चालवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, ही काळाची आणि रंगभूमीचीही गरज आहे.

-अश्विनी नांदेडकर
(लेखिका नाट्यविषयाच्या अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -