घरफिचर्स‘rose day’ विशेष : जी भावना त्या रंगाचा गुलाब

‘rose day’ विशेष : जी भावना त्या रंगाचा गुलाब

Subscribe

एका रिसर्चमधून समोर आलेल्या माहितीनुसार, प्रत्येक रंगासोबत वेगवेगळी भावना जोडलेली असते. त्यामुळे समोरच्याविषयी तुमच्या मनात जी भावना असेल त्यानुसार तुम्ही गुलाबाच रंग निवडू शकता. 

शाळा, महाविद्यालयात असल्यापासून तुम्ही ‘रोज डे’ या विशेष दिवसाविषयी नक्की ऐकलं असेल. अनेक कॉर्पोरेट ऑफिसमध्येही रोज डे साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला रंगीबेरंगी गुलाबाची फुलं देण्याची पद्धत आहे. दरवर्षी ‘७ फेब्रुवारीला’च हा स्पेशल दिवस साजरा करण्यामागे एक विशेष कारण आहे. १४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात ‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूवीर व्हॅलेंटाईन डेच्या एक आठवडा आधी म्हणजेच ७ फेब्रुवारीपासून ‘व्हॅलेंटाईन वीक’ला सुरुवात होते. या वीकमधील पहिला दिवस ‘रोज डे’ म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे दरवर्षी साधारण ७ तारखेलाच रोज डे साजरा केला जातो. जे लोक आपल्या जवळचे आहेत, जे लोक आपल्या प्रिय आहेत किंवा ज्यांचे आपल्याला मनापासून आभार मानायचे आहेत, अशांना गुलाब देऊन आपल्या मनातील भावना आजच्या दिवशी व्यक्त करायच्या असतात, असं म्हटलं जातं.

सहसा ‘व्हॅलेंटाईन डे’ला लाल रंगाचा गुलाब देऊन प्रेमी युगुल एकमेकांवरील त्याचं प्रेम व्यक्त करतात किंवा एकमेकांना लग्नासाठी अथवा रिलेशनशीपसाठी विचारतात. मात्र, ‘रोज डे’च्या दिवशी लाल गुलाबाचं बंधन नसतं. आजच्या दिवशी तुम्ही एकमेकांना लाल, गुलाबी, पिवळा, पांढरा असा कोणत्याही रंगाचा गुलाब देऊ शकता. एका रिसर्चमधून समोर आलेल्या माहितीनुसार, प्रत्येक रंगासोबत वेगवेगळी भावना जोडलेली असते. त्यामुळे समोरच्याविषयी तुमच्या मनात जी भावना असेल त्यानुसार तुम्ही गुलाबाच रंग निवडू शकता.

- Advertisement -

जशा भावना तसा रंग…

लाल गुलाब हा प्रेमाचं प्रतिक मानला जातो. त्यामुळे तुम्ही तुमची प्रियसी / तुमचा प्रियकर, तुमची पत्नी, तुमचे आई-वडिल, भावंडं यापैकी कुणालाही लाल गुलाब देऊ शकता.

पांढरा गुलाब शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे तुमच्यावर रूसलेल्या, रागावलेल्या व्यक्तीला मनवण्यासाठी तुम्ही तिला पांढरा रंग देऊ शकता.

- Advertisement -

पिवळा गुलाब हा मैत्रीचं प्रतिक असल्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणांना पिवळा गुलाब देऊ शकता.

गुलाबी रंग हा प्रशंसा आणि कृतज्ञनतेचा रंग आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या सुंदरेतेची तुम्हाला मनापासून प्रशंसा करायची असेल किंवा एखाद्याचे तुम्हाला आभार मानायेच असतील तर त्याला वा तिला तुम्ही गुलाबी रंगाचा गुलाब देऊ शकता.

याशिवाय ‘एनर्जी’ आणि ‘पॅशन’ यांचं प्रतिक समजला जाणारा केशरी किंवा नारंगी रंगाचा गुलाबसुद्धा तुम्ही एखाद्याला देऊ शकता.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -