घरफिचर्समार्केटिंग टूल झाले पथनाट्य

मार्केटिंग टूल झाले पथनाट्य

Subscribe

पथनाट्य मोठ्या आव्हानांसमोर तीव्रतेने उभे राहते आणि पुन्हा एका प्रकारे हायबरनेशनमध्ये निघून जाते. जेव्हा केव्हा एखादी बिकट परिस्थिती समोर उभी ठाकते तेव्हा पुन्हा पथनाट्य उभारून येते. कारण हे पीडितांच्या संघर्षाचे शस्त्र आहे. हा असा लाव्हा आहे जो आतल्या आत धुमसत राहतो; पण विझत नाही. १२ एप्रिल या राष्ट्रीय पथनाट्य दिवसानिमित्ताने शुद्ध क्रांती, जनआंदोलनापासून पथनाट्य आता एक मार्केटिंग टूल कसे झाले आहे, याचा आढावा घेणारा हा लेख.

पथनाट्य म्हणजे काय ?

- Advertisement -

 पथनाट्य आधुनिक शब्द आहे. रस्त्यांवर व मैदानात खेळल्या जाणार्‍या (वर्तमानातील राजनैतिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक चेतना निर्माण) नाटकांना पथनाट्य म्हणतात.

एका सामान्य माणसाचे नाटक ज्यात, (आम आदमी) समस्यांचे चित्रण असावे जे भरचौकात खेळले जाईल.

- Advertisement -

एक नाटक जे आपल्या पूर्ण नाटकीय क्षमतेसाठी प्रत्येक नाक्या नाक्यावर खेळले जाईल.

 जन संघर्ष व चेतना जागृत करण्याचे नाव आहे पथनाट्य

आव्हानांना आव्हानांसारखे स्वीकार करण्याचे नाव आहे पथनाट्य

गरीब, शोषित, पीडित आणि सर्वसामान्यांचा आवाज आहे पथनाट्य

पथनाट्याचा उद्देश

१) विशिष्ट स्थितींचे राजनैतिक विश्लेषण करून प्रेक्षकांच्या चेतनेला दिशा देणे.

२) असे नाटक करणे ज्याचे गांभीर्य, सखोलता आणि आयु तेवढी मोठी असेल जेवढी आपल्या सामाजिक समस्यांची सखोलता, गांभीर्य आणि आयु.

३) असे नाटक जे लगेचच जनतेच्या दुःखाला, वेदनेला एक औषधी ठरेल.

४) सामान्य माणूस ज्या नाटकाचा नायक असेल त्या नाटकांना प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवून जनसंघर्ष आणि चेतनेचे निर्माण करणे.

400 वर्षांचा औद्योगिक क्रांतीचा इतिहास आहे.
औद्योगिक क्रांतीनंतर कामगारांना आपला हक्क मिळवून देण्यासाठी पथनाट्याची क्रांतिकारक भूमिका राहिली आहे.
याचं कारण असं होतं की, मजदुरांनी, कामगारांनी आपल्या हक्काच्या लढाईसाठी नाट्यकलेच्या आत लपलेल्या भावना आणि क्रांतीच्या लाव्ह्याला समजले आणि नाटकाला मनोरंजनापर्यंत मर्यादित ठेवणार्‍या भांडवलशाही वृत्तीपलीकडे क्रांतीचे शस्त्र बनवले आणि नाटकाच्या एका नवीन रूपाला जन्म दिला ज्याला पथनाटक म्हटले गेले.

म्हणून नाटकाचा जन्मदाता दुसरा कोणी नाही तर मजदूर आहे, तो कामगार आहे ज्याने सामंती व्यवस्थेच्या लोहाला स्वीकारलं आणि लढून, संघर्ष करून आपल्या अधिकारांना मिळवलं. कारण मजदूर आपली गोष्ट करत होते, आपले मुद्दे मांडत होते, एका व्यवस्थेच्या विरोधात ते लढत होते. ती लढाई राजनैतिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक लढाई होती. व्यवस्थेच्या आमूलाग्र बदलाची होती, म्हणून पथनाट्यात परिवर्तनाचा लाव्हा असतो, आहे आणि न्याय, समता व समानता यांची वैचारिक प्रतिबद्धता आहे.

म्हणजे पथनाट्य सर्वहारा द्वारा सृजित अन्यायाच्या विरुद्ध लढणारे शोषितांचे, पीडितांचे शस्त्र आहे. आज जे आपण पाहतो की ऑफिस कारखाने घर कुठेही काम किंवा श्रम याचे तास, शिफ्ट किंवा वेळ निर्धारित झाली आहे, ते पथनाट्याचे माध्यम घेऊन मजुरांनी केलेल्या संघर्ष व आंदोलनामुळेच.

युरोपमध्ये निर्माण झालेली औद्योगिक क्रांती ज्या ज्या ठिकाणी विस्तारली त्या त्या ठिकाणी पथनाट्य खेळले गेले आणि ही नाट्य पद्धत, शैली जगभरात पसरली. औपनिवेशिक देशांनी या नाट्य शैलीचा उपयोग आपल्या स्वातंत्र्याच्या संघर्षासाठीदेखील केला आणि त्यात ते यशस्वी झाले. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात कामगार आणि शेतकर्‍यांनी या नाट्यशैलीचा उपयोग केला.

पथनाट्य मोठ्या आव्हानांसमोर तीव्रतेने उभे राहते आणि पुन्हा एका प्रकारे हायबरनेशनमध्ये निघून जाते. जेव्हा केव्हा एखादी बिकट परिस्थिती समोर उभी ठाकते तेव्हा पुन्हा पथनाट्य उभारून येते. कारण हे पीडितांच्या संघर्षाचे शस्त्र आहे. हा असा लाव्हा आहे जो आतल्या आत धुमसत राहतो; पण विझत नाही.

पथनाट्य आपल्या जन्मापासून आतापर्यंत अनेक दिव्यातून गेले आहे. शुद्ध क्रांती, जनजागरण, जन आंदोलन – चळवळीपर्यंतचा हा प्रवास आता निव्वळ एक मार्केटिंग टूल झाला आहे.

जसजसा काळ बदलत गेला भांडवलशाही व्यवस्थेने सर्वहाराची व्यवस्था पाडण्यासाठी, एक ध्रुवीय जगाची उभारणी करण्यासाठी, जागतिकीकरणाचे अनोखे षड्यंत्र रचले आणि जगभरातील संघटित कामगार संपविण्याचा कट केला आणि त्यांना दिहाडी मजदूर बनवले. एकाच झटक्यात विज्ञानाच्या उदयाने विकसित झालेल्या तंत्रज्ञानाने संपूर्ण जगाला एका गावात रूपांतरित करण्याचे आणि त्याचे शोषण करण्याच्या प्रणालीची निर्मिती केली. बिकट परिस्थितीत पथनाट्याच्या समोर मानवता आणि मानवी व्यवस्थेचे संरक्षण करण्याचे प्रचंड आव्हान होते.
चला या आव्हानांना समजू.

1) जागतिकीकरण :
जागतिकीकरणाने जगातील जैविक आणि भौगोलिक विविधतेला नष्ट केले आहे व करत आहे. या जागतिकीकरणाचा चेहरा अत्यंत विद्रूप आहे.

संप्रेषण – स्मार्टफोन, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, एस.एम.एस आणि इतर टेक्नॉलॉजी आणि विकल्पांचा विकास झाला, परंतु संप्रेषण प्रगाढ झाले का, की विखंडित झाले? विचार संप्रेषित होतात का? जेव्हा की विचारांच्याच कब्रस्तानावर उभे राहिले आहे जागतिकीकरण! बाजार बाजार बाजार सर्व खरेदी करा. इथे संप्रेषण तंत्राने नाती, संबंध, आपलेपणा, आनंद, सर्व विकले जाते बस तुम्ही विकत घ्या.. हा सभ्य दुनियेचा आर्थिक धर्म आहे. जीवन विका आणि खरेदी करा, सर्व काही खरेदी करा आणि विका, हे जगातील तानाशहांचे जगाच्या कल्याणासाठी, वैज्ञानिक युगातील मंत्र आणि सूत्र आहे.

2) पर्यावरण आणि प्राकृतिक संसाधने
या संकल्पनेत मुळात माणूस आणि माणुसकी श्रेष्ठ नाही, सभ्यता श्रेष्ठ नाही आहे. अर्थात फक्त नफा फायदा आणि व्यापार श्रेष्ठ आहे. या व्यवस्थेचे मूल्य मानवाच्या गरजा पूर्ण करणे नाही, उलट त्याची लालसा आणि हव्यासाला वाढवणे आहे. समता, समानता, समृद्धीच्या नावावर विषमता, अलगाव आणि हिंसा हे या व्यवस्थेच्या मुळाशी आहे जी उपभोगवादाच्या खांद्यावर बसून पृथ्वीला नष्ट करत आहे आणि पृथ्वीचा श्रेष्ठ जीव मानव आपल्या लोभापायी आपल्याच सहसोबती मानवाचा, पृथ्वीच्या इतर बाकी जिवांचा, पर्यावरण आणि जीवनासाठी उपयुक्त प्राकृतिक संसाधनांचा व स्वतःला गिळंकृत करण्यासाठी उभा आहे. सभ्यता, संस्कृती असे गोडवे गाणारा माणूस केवळ आणि केवळ खरेदी विक्रीची वस्तू बनला आहे.

3) ब्रूट पावर
जिसकी लाठी उसकी भैस या वाक्याला अंमलात आणण्याचा मंत्र आहे. नरसंहार करणार्‍या अनु हत्यारांच्या विशाल जोरावर बसलेला देश अमेरिका व त्याचे मित्र देश जगाला शांततेच्या नावावर धमकावतात व डब्ल्यूटीओमधील सर्व व्यापार मसुद्यांवर स्वाक्षरी करतात. जगातील पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक स्त्रोतांचा नाश करण्यासाठी अनैतिक कायदेशीर अधिकार मिळवतात.

4) नफा व लूट यातील फरक
प्रत्यक्षात या नवीन आर्थिक नीतीचा (कुनीती म्हटलं तर जास्त उपयुक्त ठरेल) आधार आहे बोली लावा, म्हणजेच कृत्रिम गरजा निर्माण करा. खोट्याला खरे म्हणून विका आणि हे खोटं विकणारी एक गर्दी तयार करा ज्याला हे बाजार म्हणतात. म्हणजे मुळात एक रुपयाच्या वस्तूला गर्दी म्हणजे बाजारात बोली लावून (सेन्सेक्सच्या जुगार खाण्यात) एक कृत्रिम गरज निर्माण करून त्या वस्तूला एक लाख रुपयाचे बनवणे… आता एक रुपयाची वस्तू एक लाखाची झाली यालाच हे ‘अर्थ सृजन’ म्हणतात आणि या खोट्या संकल्पनेला बनवणार्‍या आणि पसरवणार्‍याला अर्थतज्ज्ञ. अशाच खोट्यांना नोबेलने पुरस्कारीत केले जाते. मग या खोट्याचा फुगा जेव्हा फुटतो त्याला हे आर्थिक मंदीचा काळ म्हणतात… जीडीपीची तिरडी घेऊन फिरणारे, जगातील भूकमारी, हिंसा, युद्धाचे समर्थक आणि जबाबदार हे सामान्य जनतेला अर्थव्यवस्थेची समज नाही असे म्हणतात.. पण या लुटारूंना आहे. मग हे लुटारू पुन्हा पारदर्शकता, प्रामाणिकपणा, नैतिकता आणि मानवतेच्या भावना व्यक्त करतात…जगातील मध्यमवर्गीय यांचे गोडवे गातात आणि अशा देशांना विकासाचे रोल मॉडेल समजले जाते… जगातील सर्वात मोठी लोकशाही यांच्या दयाभावावर मोक्ष मिळविण्याचा मार्ग शोधते.

5) कट्टरवाद
दक्षिण पंथी राजकीय पक्ष केवळ आणि केवळ भावनांचे राजकारण करतात. हे पक्ष जनतेच्या भावनांचे राजनीतिकरण करतात. यांचे शस्त्र आहे भावना. हे जन आस्था, विश्वास, धर्म, राष्ट्रीयत्व, संस्कृती, संस्कार, सांस्कृतिक वारसा वाचवण्याचा दावा करतात आणि याच मुद्यांवर भर देतात व या मुद्यांवर यांना जनसमर्थनही मिळते. पण प्रत्यक्षात या राजनीतिक पार्ट्या भावनिक मुद्यांचे राजकारण शुद्ध स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी करतात किंवा असं म्हणू शकतो की हेच त्यांचे खरे राजनीतिक मुद्दे आहेत. असे मुद्दे जनतेच्या जवळचे असतात किंवा सर्वसाधारणपणे प्रत्येक नागरिकाच्या गर्वासमान हे मुद्दे असतात, सन्मानाचे प्रतीक असतात आणि सामान्य नागरिक याबद्दल जास्त विचार करत नाही.

6) संविधानिक व्यवस्थेच्या वैधतेवर हल्ला
दक्षिण पंथी कट्टरवाद्यांनी युवांना भडकविण्यासाठी उपयुक्त षड्यंत्र रचले आहे. युवांच्या मनाला मैले केले आहे, त्यांच्या भावनांना उत्तेजित करून त्यांच्या तर्क विचार करण्याच्या बौद्धिक क्षमतेचा र्‍हास केला आहे…. चौकटी बद्ध केले आहे आणि इतपत विष भरले आहे की भारतीय संविधानाच्या पवित्र तत्त्वांच्या विरोधात या युवकांच्या हृदयात विष घोळले आहे, याचे उदाहरण आहे अलीकडेच भारतीय विषमतांमध्ये सामाजिक न्याय आणि समतेसाठी अनिवार्य पुढाकार आरक्षण या मुद्यावर उठलेला गदारोळ, हे याचे प्रमाण आहे की, उच्चवर्णीय युवा आरक्षणाला आपल्या प्रगतीतील अडथळा मानतात.

प्रश्न आरक्षणाचा नाही, मुळात प्रश्न असा आहे की कृषीला आरक्षणाची गरज का भासली? शेतीची अशी अवस्था का झाली ज्यामुळे शेतकर्‍याला आत्महत्या करावी लागत आहे, युवांचे कृषीला एक रोजगाराच्या स्वरूपात स्वीकारणे हा पर्याय कमीच दिसून येतो, एका ग्रामीण व्यवस्थेतल्या कृषीप्रधान देशात शेतकर्‍यांची अशी अवस्था का आहे? छाती ठोक, आत्मघोषित राष्ट्रवादी पार्टी आणि त्यांची सरकार अमेरिकेच्या दबावामुळे डब्ल्यू. टी. ओ. च्या कृषी विरोधी करारावर सही करते आणि त्यांचे मंत्री संसदेत हे म्हणतात. मजबुरी थी जी करना पडा हाच या राष्ट्रवादी सरकारचा खरा चेहरा .. कथनी आणि करनीमध्ये काहीच साम्य नाही… एवढंच नाही तर या देशाच्या सार्वभौमत्वाचा अनर्थ केल्याचे हे प्रमाण आहे. हे दक्षिण पंथी राजनैतिक पक्ष नवीन आर्थिक उदारवादाच्या काळात नवीन रोजगाराच्या संधी कशा वाढतील, युवकांना रोजगार कसे उपलब्ध होतील, सरकार नवीन रोजगार कसे निर्माण करतील यावर चर्चा नाही करत. कारण यांना युवांना रोजगार मिळवून देण्यापेक्षा जातीचा आधार घेऊन जातीवादी युद्ध घडवून आणण्यात जास्त रुची आहे, जेणेकरून हे स्वतःचा हिंदुत्ववादी अजेंडा लागू करू शकतील. या कृषीविरोधी सरकारला लक्षपूर्वक पहा, खरं तर शेतकर्‍यांची अवस्था सुदृढ करण्याचे काम करायचे होते, परंतु ते न करता, जे शेतीवर अवलंबित आहेत त्यांना आरक्षणाच्या होळीत ढकलून दिले.

7) एकाधिकार वाद
हा लेख यासाठी लिहिण्याची आवश्यकता भासली. कारण आतापर्यंत हा खेळ लपूनछपून खेळला जात होता, परंतु आता तर सगळे उघडपणे केले जात आहे. भांडवलशाहीने जगातल्या सगळ्या समाजवादी सरकारांना उद्ध्वस्त केले आणि भूमंडलीकरणाचे चक्र चालवले जिथे खरेदी आणि विक्रीच्या राजनैतिक मूल्यांना स्थापित केले गेले. त्याचबरोबर संस्कृती, श्रद्धा-अंधश्रद्धा, आस्था, धर्म, देव आणि विज्ञानाचे असे मिश्रण केले की, मनुष्य सामंतवादी व्यवस्थेच्याही खाली जाऊन घसरला.

उदाहरणार्थ – स्वतःला आधुनिक बोलणारे मानव आज किती हिंसक आहेत. त्याने आण्विक अविष्काराला स्वतःचे कब्रस्तान बनवले. खरेदी-विक्री किती हिंसक आहे-म्हणजे जे विकले जाऊ शकते तेच जिवंत राहणार-आज विकासाच्या नावावर-बंधुआ मजदुरी आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या जगातल्या संपत्तीवर कब्जा करणार्‍या चोरांचा गड आहे. आपल्या गुन्हेगारांना सगळ्या सुखवस्तू मिळण्याकरिता कर्ज देते आणि आयुष्यभर त्यांना गुलाम बनवून ठेवते- त्यांना इच्छा असली तरी ते सोडून नाही जाऊ शकत. कारण कर्ज कसे फेडणार? आणि वरून या चोरांचा शगुफा वी आर लिबरल यू हव ए चॉईस; पण मगरींच्या घोळक्यात अडकल्यावर कसले आले चॉईस? बस आयुष्यभर बाजारात विकले जा.

8) भांडवलशाही मीडियाचे वर्चस्व
लोकतंत्राचा चौथा स्तंभ मीडिया भांडवलशाही आणि अंधश्रद्धेला विकण्याचे मार्केट आहे. देशाचे राजनैतिक नेतृत्व भांडवलशाहीचे पंख लावून विदेश भ्रमण करण्यात अव्वल आहेत. देशातले वृद्ध टीव्हीवर मोठ्या धार्मिक गुरूंच्या जाळ्यात अडकून देवाच्या नावाखाली अंधश्रद्धेचे गुलाम बनून आपल्याच मुलांशी भांडत आहेत. युवा ‘विज्ञान’च्या नावाखाली तंत्रज्ञानाला विकत आहे. मध्यमवर्गीय उपभोगतावादाच्या चक्रव्यूहात भांडवलशाहीला आपला सेवाहार मानून बुलेट ट्रेनचे स्वप्न बघत होते. जिथे सरळ स्वर्गातील पायर्‍यांवर पाऊल ठेवले जाऊ शकेल. म्हणजे ज्यावेळी सामंतवादी व्यवस्थेमध्ये मुट्ठीभर लोकांच्या हातात विश्वाची संपत्ती होती- 400 वर्षांनंतर – ‘लोकतांत्रिक’ जगात शेअर मार्केटच्या माध्यमातून ती संपत्ती परत मुठ्ठीभर लोकांच्या हातात आहे.

9. विकासाचे मॉडेल

एक भांडवलशाही अजगर जो स्वतःलाच गिळतो आहे आणि महानगराचा आकार घेऊन विकासाचे मॉडेल बनून खरेदी विक्रीची माळ जपत आहे. विनाशाच्या दिशेने पुढे जात आहे. या महान अमानवीय विनाशापासून वाचण्यासाठी – खरेदी आणि विक्री या सूत्राला मुळापासून नाकारणे. जेवढी गरज तेवढा उत्पाद. अनियंत्रित मुनाफा संपवणे आणि मेहनतीचा मोबदला देणे. प्राकृतिक संसाधनांवर जनतेचा हक्क, पाणी, हवा, भूमी आणि प्रकृतीचे संवर्धन, पुनःसंवर्धन या बाबी आवश्यक आहेत.

विकासाचे मॉडेल असणार्‍या महानगरांचा तिरस्कार आणि आत्म स्वावलंबी गावांना प्रकृती प्रिय विकास, भांडवलशाही ऐवजी खर्‍या अर्थाने लोकतंत्र, तंत्रज्ञान ऐवजी विज्ञान जीवनाचे आधार बनेल. हाच सर्वोत्तम मार्ग आहे, जो विनाशाच्या समोर उभ्या मानवता आणि आण्विक आविष्कारांच्या अभिशापापासून मानव आणि सृष्टीला वाचवू शकेल.

10) पथनाट्याविषयी गैरसमज
पथनाट्य हा काही माकडांचा व त्याच्या मालकांचा खेळ नाही, असे सो कॉल्ड रंगकर्मीं सांगतात. गोष्ट मदारीच्या श्रमाची आणि वाक्पटुता आणि त्याच्या पराभवाची नाही आहे. गोष्ट उद्देशाची आहे, की जिथे पथनाट्य प्रत्येक ‘समस्येला’ उघडपणे प्रेक्षकांसमोर ठेवते तिथे मदारी फक्त आपल्या वाक्पटुतेमधून आपले ‘पोट भरतो’ , जिथे पथनाट्य जनतेला त्यांच्या मुद्यांवर भांडायला शिकवते, संगठित करून संघर्षासाठी उत्प्रेरित करते.

पथनाट्य ‘लोकनाट्य’ पण नाही. कारण ‘लोकनाट्य’ आणि पथनाट्याच्या निर्माणात वैचारिक अंतर आहे. पथनाट्य शुद्ध ‘परिवर्तनाच्या’ जाज्वल्यतेने ओतप्रोत आहे आणि ‘लोकनाट्य’ मुळात लोकांच्या आनंदासाठीची एक अनुभूती आहे.

पथनाट्य कोणत्याही फिल्मी गाण्याची पैरेडी नाही. हे हास्याचे माध्यम पण नाही. हे शोषितांचे शेवटचे शस्त्र आहे. कारण न्यायाचे सगळे दरवाजे जेव्हा बंद होऊन जातात तेव्हा ‘शोषितांकडे’ रस्त्यावर उतरल्या शिवाय कुठलाच मार्ग उरत नाही. पथनाट्याचे विषय ‘जन सरोकारांनी’ ओतप्रोत असतात. या विषयांमध्ये ‘राजनैतिक’ व्यवस्थेला बदलण्याचा सूर प्रखर असतो.

म्हणून पथनाट्यकर्मींमध्ये राजनैतिक प्रक्रियेची जागरूकता अनिवार्य आहे. जेव्हा उपाशी पोटाला जेवण मिळत नाही, बलात्काराचा शिकार झालेल्या व्यक्तीला न्याय नाही मिळत, मजदूर आणि कृषीला जेव्हा आत्महत्या करावी लागते, जातीमुळे वर्षानुवर्षे तिरस्कार सहन करावा लागत असेल, हुंड्यासाठी कोणाला जाळलं जात असेल किंवा तंत्रज्ञानाचा उपयोग करून ‘लिंगनिदान’ करून गर्भातून पाडले जात असेल तिथे ‘जोक’ नाही मारला जाऊ शकत, फक्त ‘वेदनेचे विश्लेषण करून स्वतःच्या हक्कांसाठी लढा दिला जातो. ‘हे दुर्दैव आहे की आता पथनाट्याचा उपयोग ‘मार्केटिंग’साठी केला जात आहे. हे सर्वसामान्य जनता आणि परिवर्तनाच्या सर्व सुलभ शस्त्रावर ‘खरेदी आणि विक्री’च्या संस्कृतीला जोपासणार्‍यांचे या माध्यमावर हक्क गाजवण्याचे षड्यंत्र आहे.

या विक्राळ आव्हानांचा सामना आज ‘जनता’ करू इच्छित आहे तर त्यांच्यासमोर 400 वर्षांआधी सुत्रपात झालेली कला म्हणजेच पथनाट्याचा उपयोग एक सशक्त पर्याय आहे. कारण हा व्हर्च्युअल संवादाऐवजी सरळ संवाद आहे. विश्वास जागृत करणारे आणि क्रियान्वनच्या दिशेने प्रेरित करणारे माध्यम आहे. व्यक्तिवादाऐवजी ‘सामूहिकतेला’ वाढवणारे आहे. या युवा देशातल्या युवांच्या ऊर्जेला योग्य दिशा देणारे ‘सामान्य जनतेचे सामान्य माध्यम आहे .जनतेला ठगणार्‍या पोलिटिकल रॅल्यांच्या बाजारू माध्यमांच्या थेट प्रक्षेपणाला तोंड देणारे विश्वसनीय माध्यम आहे. कारण पथनाट्य संसाधनांनी नाही तर न्यायसंगत भावना आणि सर्वसामान्यांच्या वैचारिक वचनबद्धतेच्या इंधनाने चालते.

– मंजुल भारद्वाज (रंगचिंतक)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -