आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

Mumbai
Horoscope
राशी भविष्य
मेष :- वैर करण्यात फायदा नसतो. परिस्थिती समजावून घ्या. घाईत मत प्रदर्शन करणे सभ्यपणाचे ठरणार नाही.
वृषभ :- मनाप्रमाणे काम करून घेता येईल. वरिष्ठांना राजी करण्यासाठी थोडा वेळ लागेल. आर्थिक उलाढाल शक्य होईल.
मिथुन :-  घरगुती कामे करून घेण्यात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ खुष होतील. आशादायक परिस्थिती तयार होईल क्षेत्रकोणतेही असो.
कर्क :-  शत्रूला कमी न लेखता तुमचे हित साधावे लागेल. अहंकार ठेऊ नका. सरळ बोला व वागा.
सिंह :- धंद्याला तेजी येईल. व्यवसायाचा जम बसवण्यासाठी इतरांची मदत घेता येईल. समस्या सोडवता येईल.
कन्या :- मनची चंचलता होईल. आपले मत व्यक्त करण्यासाठी योग्य व्यक्तींची निवड करता येईल.
तूळ :- तुमचे मत इतरानवर लादता येणार नाही. हट्टीपणाने वागून गैरसमज होऊ शकतो. वाहन जपून चालवा.
वृश्चिक :-  डावपेच यशस्वी होतील. ज्येष्ठ व्यक्तीची मदत होईल. धंद्यातील अंदाजबरोबर येईल. फायदा घ्या.
धनु :- अतिरेक केल्यास जुळत आलेले काम फिसकटू शकते. लोक तुम्हाला मानाची वागणूक देतील.
मकर :- अडचणीवर मात करता येईल. जिद्द ठेवा. कुणालाही दुखवु नका. प्रेमाच्या बोलण्याला फसू नका.
कुंभ :- आप्तेष्ठांच्या भेटीगाठीत यश. प्रवासात दगदग होईल. धंद्यात सुधारणा करता येईल.
मीन :- रेंगाळलेले काम मार्गी लावता येईल. अधिकारी वर्गाशी ओळख होईल. धंद्यात वाढ करता येईल.