आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

Mumbai
Horoscope 44
राशीभविष्य

मेष :- काम करण्याची गती वाढवा. महत्वाची चर्चा आजच करून घ्या. तुम्ही ठरविल्याप्रमाणे कार्यक्रम पूर्ण होईल.

वृषभ :- धंद्यात कामगारांना जास्त काम करावे लागेल. कुरकुर होईल. तुमचा निर्णय योग्य ठरेल. प्रेमाने वागा.

मिथुन :- वरिष्ठाच्या विरोधात न जाता काम करा. यश जिद्दीने मिळवता येईल. घरातील वाद संपवता येईल.

कर्क :- कायद्याचे पालन करा. जवळच्या माणसांची काळजी घ्यावी लागेल. मनावर दडपण येईल.

सिंह :- आपले कोण परके कोण हे ओळखून ठेवा. विरोधक तुम्हाला प्रेमाने बोलावतील. समस्या सोडवा.

कन्या :- तुम्ही केलेल्या चूका विरोधक दाखवतील. रागावर ताबा ठेवा. प्रवासात धोका संभवतो. खर्च वाढेल.

तूळ :- आप्तेष्ठांची भेट होईल. धंद्यात वाढ करता येईल. कामाची गती वाढवता येईल. स्पर्धा जास्त होईल.

वृश्चिक :- तुमचे बोलणे वादग्रस्त ठऊ शकेल. धंद्यात सावध रहा. गोड बोलूनच रहावे लागेल.

धनु :- आप्तेष्ठांच्या मदतीने समस्या सोडवता येईल. धंद्यातील कमतरता समजून घ्या. नवा निर्णय घ्यावा लागेल.

मकर :- धंद्यात जम बसवता येईल. जवळच्या माणसांचा विचार समजून घ्या. मान-प्रतिष्ठा वाढेल. स्पर्धा जिंकाल.

कुंभ :- समजून-उमजूनच तुम्ही मत व्यक्त करा. कमी बोला. मैत्रीची भाषा ठेवणेच उपयोगी पडेल. अरेरावी नको.

मीन :- तुमच्या मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागेल. वाद वाढवू नका. सामाजिक कार्यात प्रसंगानुरूप बोला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here