आजचे भविष्य : २९ सप्टेंबर २०१८

Mumbai

मेष :  आर्थिक चणचण दूर करता येईल. आप्तेष्ठ-मित्र यांच्या भेटी होतील. व्यवसायात लाभ होईल.

वृषभ  : मनाची चंचलता होईल. घरगुती खर्च वाढतील. पाहुणे येतील. क्षुल्लक मतभेद होतील.

मिथुन :  कार्यक्रमात अचानक बदल करावा लागेल. गुप्त कारवायांचा त्रास होईल. महत्वाच्या वस्तू सांभाळा.

कर्क  : पाहुण्यासाठी खर्च करावा लागेल. संततीबरोबर चर्चा करताना सौम्य शब्द वापरा. स्पर्धा जिंकता येईल.

सिंह :  मनोनिग्रह कायम ठेवता येईल. मुलांच्या हट्टासाठी खर्च करावा लागेल. खरेदी कराल.मैत्रीत तणाव राहिल.

कन्या :  समारंभात सहभागी व्हावे लागेल. स्पर्धा सरस ठरेल. भेटी गाठीत यश मिळेल.

तूळ :  दगदग व धावपळ होईल. थकवा जाणवेल. मोठे खरेदी संभवते. महत्वाच्या वस्तू वेळेवर जागेवर ठेवा.

वृश्चिक :  उत्साहाच्या भरात अनेक कामे होतील. भेटी-गाठीत यश व चर्चा सफल होईल.

धनु : विरोधाला कडवट उत्तर दिल्याने तणाव वाढेल. मनावर दडपण येईल. स्पर्धा अटीतटीची होईल.

मकर : संततीबरोबर मौज-मजेत गप्पा कराल. त्यांचा हट्ट पुरवावा लागेल. खुष खबर मिळेल. जुने येणे वसूल करा.

कुंभ : किरकोळ दुखापत संभवते. प्रवासात सावध रहा. खर्च वाढेल. प्रतिष्ठित व्यक्तीची भेट घडून येईल.

मीन : धंदा वाढेल. उत्साहवर्धक वातावरण राहिल. घरात शुभकार्य करण्याचे ठरेल. खरेदीवर खर्च कराल.