राशीभविष्य सोमवार २७ जुलै २०२०

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ः- तुमचे मन स्थिर होईल. तुमचा विचार पटवून देण्याचा प्रयत्न करा. हट्ट धरू नका.

वृषभ ः- काम करण्यास क्षुल्लक अडचण येईल. मन अस्थिर झाल्याने कामात गोंधळ होऊ शकतो.

मिथुन ः- तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. पदाधिकार मिळण्याची शक्यता वाढेल.

कर्क ः- कठीण काम करून घ्या. नोकरी लागेल. तुमचा प्रभाव, लोकप्रियता वाढेल.

सिंह ः- कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करता येईल. अरेरावी करू नका. ऐकून घ्या.

कन्या ः- कायद्याच्या बाबतीत सावध रहा. भांडण वाढवू नका. दगदग करावी लागेल.

तूळ ः- सर्वांच्या मनाचा विचार करून निर्णय घेता येईल. धंद्यात फायदा होईल. ठरविलेले काम कराल.

वृश्चिक ः- विरोधाला सौम्य भाषेत उत्तर द्या. धंद्यात नोकर माणसे कमी होतील. गोड बोला.

धनु ः- अपेक्षित व्यक्ती भेटेल. तुमचा उत्साह वाढेल. महत्त्वाची वस्तू वेळीच जागेवर ठेवा.

मकर ः- कामाचा वेग वाढवा. पुढची योजना तयार करा. धंद्यात मागे राहू नका.

कुंभ ः- तुमच्या बोलण्याला चांगला प्रतिसाद मिळेल. तरीही काही लोक कुरबुर करतील. युक्ती वापरा.

मीन ः – तुमचा अंदाज बरोबर येईल. कठीण काम करून घ्या. चर्चा व भेट सफल होईल.