घरलाईफस्टाईल'केसतोड' आल्यास हे करा घरगुती उपाय

‘केसतोड’ आल्यास हे करा घरगुती उपाय

Subscribe

केसतोडवर घरगुती उपाय

बऱ्याचदा केसतोड अनेकांना कधीना कधी होते. परंतु केसतोड का होतात आणि यावर नेमके काय उपाय करावे, हे अनेकांना माहित देखील नसते. त्यामुळे आज आपण केसतोड का होते आणि त्यावर काय उपाय आहेत हे पाहणार आहोत.

केसतोड म्हणजे काय?

शरीराच्या कोणत्याही भागावरील केस मुळापासून तुटला का त्याठिकाणी केसतोड येते. त्यानंतर ती कालानंतराने मोठी होते आणि त्यात पस देखील होतो. त्याचे दुखणे फार असह्य असे असते.

- Advertisement -

केसतोडवर उपाय

हळद

केसतोडीचे दुखणे असह्य होते, अशावेळी हळद ही औषधी ठरते. हळद ही बहु गुणकारी आहे. त्यामुळे केसतोड आल्यास बऱ्याचदा सूज येते अशावेळी हळद आपण केसतोडवर लावल्यास त्रास कमी होतो.

- Advertisement -

लसूण

आयुर्वेदामध्ये लसूण हा औषधी मानला जातो. आपल्या नियमित आहारात लसणाचा समावेश केल्यास अनेक आजारांपासून सुटका होण्यास मदत होते. तसेच केसतोडवर लसूण एक रामबाण उपाय आहे. केसतोड आल्यास लसूण ठेचून त्याचा लेप बाजून लावल्यास केसतोड कमी होते आणि दोन ते तीन दिवसात बरी होते.

मेहंदी

केसतोड आल्यास प्रचंड आग आग होते. अशावेळी मेहंदीचा वापर करावा. मेहंदी थंड असल्याने ती पाण्यात कालवून केसतोडच्या बाजूला लावाली. यामुळे त्रास कमी होतो.

कडूनिंब

कडूनिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहे. ज्यामुळे तुम्हाला होणाऱ्या वेगवेगळ्या अॅलर्जी पासून बचाव होतो. कडूनिंब आपल्या शरीरावरील केसतोड मुळातून आणि कुठल्याही प्रादुर्भावाशिवाय काढून टाकतो. यासाठी मुठभर कडूनिंबाच्या पानाचा लेप केसतोडवर लावावा. यामुळे निश्चित फायदा होतो.

कांदा

कांदा हा बहुगुणी आहे. कांदा हा केसतोडावर एक रामबाण उपाय आहे. यासठी कांदा चांगला ठेचून त्याची पेस्ट करुन तो केसतोडच्या बाजूने लावाला आणि कपड्याने तो बांधून घ्यावा. कमीत कमी २ तास हा कांदा कपड्याने बांधून केसतोडाच्या ठिकाणी ठेवावा. यामुळे आराम मिळतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -