घरलोकसभा २०१९दोन डमी उमेदवार असूनही सुनील तटकरेंना यावेळी हरवू शकले नाहीत

दोन डमी उमेदवार असूनही सुनील तटकरेंना यावेळी हरवू शकले नाहीत

Subscribe

रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे अनंत गीते यांचा पराभव केला आहे. गीते यांचा तब्बल ३२ हजार मताधिक्याने पराभव करत तटकरे यांनी २०१४ च्या पराभवाचा वचपा काढला आहे. मागच्या निवडणुकीत तटकरे अवघ्या २१०० मतांनी पराभूत झाले होते. मात्र त्यांचा हा पराभव अनंत गीतेंनी नाही तर सुनील तटकरे नावाच्या उमेदवारानेच केला होता.

२०१४ साली अनंत गीते यांनी ३ लाख ९५ हजार ९५१ मते मिळवली होती. तर सुनील तटकरे यांनी ३ लाख ९४ हजार ७ मते मिळवली होती. मात्र अपक्ष उमेदवार सुनील तटकरे यांनी ९ हजार ८४७ मते घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या तटकरेंचा अवघ्या २१०० मतांनी पराभव झाला होता.

- Advertisement -

यावेळी देखील दोन अपक्ष सुनील तटकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यापैकी सुनील पांडुरंग तटकरे यांनी ४ हजार ६३ मते आणि सुनील सखाराम तटकरे यांनी ९ हजार ६०९ मते घेतलेली आहेत. यावेळी दोन डमी उमेदवार तटकरेंच्या विरोधात उभे होते. मात्र तरिही त्यांचा पराभव होऊ शकला नाही. शेतकरी कामगार पक्षाने यावेळी तटकरेंना पाठिंबा दिला होता. २०१४ साली शेकापने १ लाख ९७ हजार मते मिळवली होती.

मताधिक्य मिळवल्यानंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, “श्रीवर्धन, रोहा, म्हसळा या तालुक्यातील जनतेने मला उदंड प्रतिसाद दिला याबद्दल मी जनतेचा ऋणी राहिल. बॅ. ए. आर. अंतुले यांना जे मताधिक्य मिळाले नव्हते तेवढे मताधिक्य मला मिळाले.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -