घरमहा @२८८घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १६९

घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १६९

Subscribe

घाटकोपर पश्चिम (विधानसभा क्र. १६९) हा मुंबई उपनगरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघातला घाटकोपर पश्चिम हा एक विधानसभा मतदारसंघ आहे. जो ट्रेंड लोकसभा निवडणुकांमध्ये दिसतो, तोच ट्रेंड या मतदारसंघात विधानसभा निवडणुकांमध्ये देखील दिसतो. त्यामुळेच, लोकसभेसाठी भाजपच्या पाठिशी उभा राहिलेला इथला मतदार विधानसभेसाठी देखील भाजपच्याच पाठिशी राहिला आहे. बाजूच्या घाटकोपर पूर्व मतदारसंघाच्या मानाने हा मतदारसंघ एक चतुर्थांश म्हणावा इतका लहान आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून इथलं स्थानिक राजकारण शिवसेना, मनसे आणि भाजप या पक्षांच्या भोवती फिरत राहिलं आहे. या मतदारसंघात एकूण २८८ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १६९

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,६९,३५७
महिला – १,३३,७४७

- Advertisement -

एकूण मतदार – ३,०३,१७२


ram kadam
राम कदम

विद्यमान आमदार – राम कदम, भाजप

आधी मनसे आणि नंतर भाजप असे दोनदा राम कदम घाटकोपरमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. २००९मध्ये ते मनसेच्या तिकिटावर निवडून गेले होते. शिवसेनेच्या सुधीर मोरेंचा त्यांनी पराभव केला होता. मात्र, नंतर भाजपच्या तिकिटावर त्यांनी पुन्हा सुधीर मोरेंचा दुपटीहून अधिक मतांनी पराभव करत २०१४मध्ये विधानसभेत प्रवेश केला. राम कदम यांचा घाटकोपरमधला दहीहंडी उत्सव प्रसिद्ध आहे. मात्र, याच दहिहंडी उत्सवादरम्यान राम कदम यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) राम कदम, भाजप – ८०,३४३
२) सुधीर मोरे, शिवसेना – ३८,४२७
३) दिलीप लांडे, मनसे – १७,२०७
४) रामगोविंद यादव, काँग्रेस – १०,०७१
५) हरून खान, राष्ट्रवादी – ७४२६

नोटा – १८७९

मतदानाची टक्केवारी – ५२.७० %


हेही वाचा – मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -