घरमहा @२८८विक्रमगड विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १२९

विक्रमगड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२९

Subscribe

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड (विधानसभा क्र. १२९) विधानसभा मतदारसंघ आहे.

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड हा क्रमांक १२९ चा विधानसभा मतदारसंघ असून या मतदारसंघात एकूण ३३७ मतदान केंद्र आहेत. विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेला विक्रमगड विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. तसेच पूर्वीच्या जव्हार मतदारसंघावर असलेले माकपचे वर्चस्व संपुष्टात आणून भाजपने या मतदारसंघावर वर्चस्व निर्माण केले आहे. दरम्यान, २०१४ च्या निवडणुकीत माजी मंत्री विष्णू सवरा यांनी भाजप-शिवसेना युती नसताना आपला मतदारसंघ बदलून विक्रमगडमधून निवडणूक लढविण्याचा धोका पत्करला आणि तो यशस्वीपणे पेलला देखील. निवडणुकीदरम्यान तत्कालीन आदिवासी आमदारांविरोधात सुरू असलेल्या बिगर आदिवासी आंदोलनाचा लाभ उठवत सवरांनी शिवसेनेच्या प्रकाश निकम व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील भुसारांना पराभवाची धूळ चारली होती. अत्यंत चुरशीच्या लढतीत सवरा सहाव्यांदा विधानसभेवर निवडून आल्याने त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. आदिवासी विकाससारखे महत्त्वाचे मंत्रिपद लाभूनही सवरा मतदारसंघातील प्रश्न सोडवू शकले नाहीत, असा आरोप विरोधक करत आहेत.


मतदारसंघ क्रमांक १२९

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जमाती

मतदारांची संख्या

पुरुष –,२५,७१०

- Advertisement -

महिला ,२०,७२१

एकूण मतदार –,४६,४३१


विद्यमान आमदार – विष्णू रामा सवरा, भाजप

विष्णू रामा सवरा हे भाजपचे विद्यमान आमदार असून ते १९९० सालापासून सहावेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले आहेत. विधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत भाजपचे विष्णू सवरा शिवसेनेचे प्रकाश निकम यांच्यात चुरशीची लढत झाली. तर राष्ट्रवादीचे सुनील भुसारा हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. या तिघांमध्ये प्रचंड रस्सीखेच होताना त्यावेळी पहायला मिळाली. कोण जिंकेल याची उत्सुकता शेवटपर्यंत ताणली गेली होती. त्यावेळी सवरा अत्यंत कमी मताधिक्याने विजयी झाले. या निवडणुकीत भाजपच्या विष्णू सवर यांना ४० हजार २०१ मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या प्रकाश निकम यांना ३६ हजार ३५६ इतकी मते मिळाली होती. राष्ट्रवादीच्या सुनील भुसारा यांना ३२ हजार ०५३ तर बहुजन विकास आघाडीच्या रामचंद्र गोविंद यांना अवघी १८ हजार ०८५ मते मिळाली होती. तर विक्रमगड मतदारसंघात आदिवासी मतदारांचे प्राबल्य आहे. आगामी निवडणुकीत भाजपला कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी, काँग्रेस व बहुजन विकास आघाडी देऊ शकते. युती झाल्यास शिवसेनाही या मतदारसंघावर दावा करेल त्यामुळे आगामी काळात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

विष्णु रामा सवरा, भारतीय जनता पक्ष – ४०,२०१
प्रकाश निकम, शिवसेना ३६,३५६
सुनिल भुसारा, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष – ३२,०५६
गोविंद रामचंद्र, बहुजन विकास आघाडी १३,१५२
रतन बुधर, माकप – १३,१५२

नोटा ,१८८

मतदानाची टक्केवारी ६८.१७%


हेही वाचा – पालघर लोकसभा मतदारसंघ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -