घरमहा @४८३७ - अहमदनगर लोकसभा मतदारसंघ

३७ – अहमदनगर लोकसभा मतदारसंघ

Subscribe

अहमदनगर दक्षिण मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाला ओळखले जाते. अहमदनगर जिल्ह्याला फार जुना इतिहास आहे. अहमदनगरला पुर्वी बहामनी म्हणजेच ब्राह्मणांचे राज्या म्हटले जायचे. मात्र त्यानंतर १४८६ साली मलिक अहमदने या प्रांताचा पंतप्रधान झाला. त्याच्याच नावाने या प्रांताला अहमदनगर असे नाव मिळाले. १८१७ रोजी ब्रिटिशांच्या ताब्यात जाईपर्यंत अनेक निजाम आणि मुघल राज्यांनी अहमदनगरवर राज्य केले.

अहमदनगर जिल्हा नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. पश्चिमेला सह्याद्रीचा डोंगराळ भाग आहे. कळसूबाई, हरिशचंद्र गड, रतनगड याच जिल्ह्यात येतात. जिल्ह्यात गोदावरी आणि भीमा या दोन प्रमुख नद्या आहेत. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्राच्या मधोमध वसलेला असून त्याला आठ जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत.

- Advertisement -

राजकीय गणिताबाबत बोलायचे झाल्यास या मतदारसंघावर आतापर्यंत काँग्रेसचे वर्चस्व दिसत होते. मात्र १९९९, २००९ आणि २०१४ रोजी भाजपच्या दिलीपकुमार गांधी यांनी विजय मिळवलेला आहे. नगर जिल्ह्याला पाणी आणि पाऊस चांगला असूनही या जिल्ह्याचा अपेक्षित विकास झालेला नाही. इथून निवडून आलेले चार खासदार आतापर्यंत केंद्रात मंत्री झालेले आहेत.


 

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – ३७

नाव – अहमदनगर

संबंधित जिल्हा – अहमदनगर

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती, उद्योग

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या (२०१४) – १६ लाख
९५ हजार २६५

पुरुष – ८ लाख ९५ हजार ९५६

महिला – ७ लाख ९९ हजार २४८


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

डॉ. सुजय राधाकृष्ण विखेपाटील – भाजप – ७ लाख ४ हजार ६६०

संग्राम जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस – ४ लाख २३ हजार १८६

सुधाकर अव्हाड – वंचित बहुजन आघाडी – ३१ हजार ८०७

नामदेव अर्जुन वाकळे -बहुजन समाज पार्टी – ६ हजार ६९२

नोटा – ४ हजार ०७२


अहमदनगर मधील विधानसभा मतदारसंघ

२२२ शेवगाव – मोनिका राजीव राजळे, भाजप

२२३ राहुरी – शिवाजी कर्डिले, भाजप

२२४ पारनेर – विजयराव औटी, शिवसेना

२२५ अहमदनगर शहर – संग्राम जगताप, राष्ट्रवादी

२२६ श्रीगोंदा – राहुल जगताप, राष्ट्रवादी

२२७ कर्जत जामखेड – प्रा. राम शिंदे, भाजप


mp dilipkumar gandhi
भाजपचे खासदार दिलीपकुमार गांधी

विद्यमान खासदार – दिलीपकुमार गांधी, भाजप

खासदार दिलीप गांधी यांनी स्थानिक स्वराज संस्थेपासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. १९९९ ला पहिल्यांदा ते खासदार झाले. दक्षिण मतदारासंघात भाजपचे चांगलेच प्राबल्य झालेले आहे. २००४ ला तुकाराम गडाख यांचा अपवाद वगळता दिलीप गांधी २००९ पासून सलग दोन वेळा खासदार झाले आहेत. यावेळी देखील त्यांनाच तिकिट मिळेल, असे दिसत आहे. शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे दिलीप गांधी यांचा मार्ग सुकर झालेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करुन नगर शहरातून जाणाऱ्या ९ महामार्गांचा अंतर्भाव राष्ट्रीय महामार्गात करुन घेतला. नगरची औद्योगिक वसाहत मोठी व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न केले. २०१४ साली राष्ट्रवादीकडून राजीव राजळे यांना गांधी यांच्याविरुद्ध उमेदवारी दिली होती. मधल्या काळात त्यांचे दुःखद निधन झाले. राजळे यांच्या पत्नी भाजपमधूनच आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून योग्य उमेवदवाराची चाचपणी सुरु आहे. त्याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे म्हटले जात आहे.

 


 

२०१४ मधील मतांची आकडेवारी

दिलीपकुमार गांधी, भाजप – ६ लाख ५ हजार १८५

राजीव राजळे, राष्ट्रवादी – ३ लाख ९५ हजार ५६९

बबन कोळसे पाटील, अपक्ष – १२ हजार ६५९

किसन काकडे, बसपा – ८ हजार ३८१

नोटा – ७ हजार ४६८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -