२ – धुळे लोकसभा मतदारसंघ

Maharashtra
2 - Dhule (ST) Lok Sabha Constituency
धुळे लोकसभा मतदारसंघाचा नकाशा

धुळे मतदारसंघामध्ये सध्या धुळे जिल्ह्यातील तीन आणि नाशिक जिल्ह्यातील तीन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा हे धुळे जिल्ह्यातील चार तालुके आहेत. अर्धा शहरी तर अर्धा ग्रामीण भाग या मतदार संघात येतो. धुळे जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. धुळे जिल्हा हा येथील शुद्ध दुधाकरता सर्वत्र प्रसिद्ध आहे. कधी काळी दिल्लीमधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरता वाट पाहत असत. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे. ज्या ठिकाणी मक्यापासून ग्लुकोज साखर आणि अन्य पदार्थ बनवले जाता. लळिंगचा किल्ला, शिरपुरचे बालाजीचे मंदीर, नकाणे तलाव, राजवाडे संशोधन मंडळ हि धुळे जिल्ह्यातील काही पर्यटनाची स्थळे आहेत. धुळे जिल्हा कापूस, मिरची, ज्वारी, ऊस ह्यांच्या उत्पादनाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. तापी नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे.

मतदारसंघाचा क्रमांक – २

नाव – धुळे

संबंधित जिल्हे – धुळे आणि नाशिक

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती, दुग्ध व्यवसाय, साखर कारखाने

प्रमुख शेती पीक – कापूस, मिरची, ज्वारी, ऊस

शिक्षणाचा दर्जा – ७४.६१ टक्के


मतदारसंघ राखीव – खुला

एकूण मतदार – २० लाख ४८ हजार ७८१

महिला – ९ लाख ९२ हजार ११२

पुरुष – १० लाख ५५ हजार ६६९


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

सुभाष भामरे – भाजप – ६ लाख १३ हजार ५३३

कुणालबाबा रोहिदास पाटील – काँग्रेस -३ लाख ८४ हजार २९०

नबी अहमद दुल्ला – वंचित बहुजन आघाडी – ३९ हजार ४४९

अनिल अण्णा – लोकसंग्राम – ८ हजार ४१८

संजय यशवंत अपरांती – बहुजन समाज पार्टी – ४ हजार ६४५


धुळेमधील विधानसभा मतदारसंघ

धुळे जिल्हा

६ धुळे ग्रामीण – कुणाल रोहिदास पाटील, काँग्रेस

७ धुळे शहर – अनिल गोटे, भाजप

८ सिंदखेडा – जयकुमार रावल, भाजप

नाशिक जिल्हा

११४ मालेगाव मध्य – आसिफ शेख, काँग्रेस

११५ मालेगाव आऊटर – दादजी भुसे, शिवसेना

११६ बगलन (ST) – दीपिका चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस


Dr-Subhash-Bhamre
सुभाष भामरे, भाजप

विद्यमान खासदार – सुभाष भामरे, भाजप

धुळे लोकसभा मतदारसंघातून २०१४ च्या निवडणुकीतून भाजपचे सुभाष भामरे यांना विजय मिळाला. त्यांनी काँग्रेसच्या अमरिष पटेल यांचा ४ लाख ७२ हजार ५८१ मतांनी पराभव केला. डॉ. सुभाष भामरे सध्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत.


२०१४ मधील मतांची आकडेवारी

सुभाष भामरे, भाजप – ५ लाख २९ हजार ४५०

अमरिष पटेल, काँग्रेस – ३ लाख ९८ हजार ७२७

निहाल अन्सारी, आप – ९ हजार ३३९

नोट – २ हजार ४९६

मतदानाची टक्केवारी – ५९ % (४२.५३%)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here