घरमहा @४८९ - रामटेक लोकसभा मतदारसंघ

९ – रामटेक लोकसभा मतदारसंघ

Subscribe

रामटेक या मतदारसंघामध्ये सध्या नागपूर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे. रामटेक या मतदारसंघामध्ये सध्या नागपूर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे. रामटेक हे नागपूर जिल्ह्यातील पवित्र व निसर्गरम्य स्थान. लोकसंख्या १६,७३३ (१९८१ अंदाज). हे नागपूरच्या ईशान्येस रस्त्याने ५५ किमी. वर आहे. नागपूर-जबलपूर या राष्ट्रीय महामार्गावरील मनसर या ठिकाणाहून येथे रस्ता जातो. नागपूरशी हे लोहमार्गानेही जोडलेले असून अंबागड टेकड्यांच्या पायथ्याशी आहे. रामटेक म्हणजे ‘रामाची टेकडी’, रामाने वनवासकाळात या टेकडीवर काही काळ विश्रांती घेतली म्हणून यास रामटेक नाव पडले, असेही म्हटले जाते.

मतदारसंघाचा क्रमांक – ९

- Advertisement -

नाव – रामटेक

संबंधित जिल्हे – नागपूर

- Advertisement -

प्रमुख उद्योग-व्यवसाय – दुग्ध व्यवसाय


मतदारसंघ राखीव – (SC)

एकूण मतदार – १० लाख ४९ हजार २७८

महिला – ४ लाख ७३ हजार ००७

पुरुष – ५ लाख ७६ हजार २७१


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

कृपाल तुमाने – शिवसेना – ५ लाख ९७ हजार १२६

किशोर गजभिये- काँग्रेस – ४ लाख ७० हजार ३४३

सुभाष धर्मदास गजभिये – बहुजन समाज पार्टी – ४४ हजार ३२७

किरण प्रेमकुमार रोडगे – वंचित बहुजन आघाडी – ३६ हजार ३४०

नोटा – ११ हजार ९२०


रामटेक विधानसभा मतदारसंघ

नागपूर जिल्हा

४८ काटोल – आशिष देशमुख, भाजप

४९ सावनेर – सुनील केदार, काँग्रेस

५० हिंगणा – समीर मेघे, भाजप

५१ उमरेड (SC) – सुधीर पारवे, भाजप

५८ कामठी – चंद्रशेखर बावनकुळे, भाजप

५९ रामटेक – डॉ. मल्लिकार्जुन रेड्डी, भाजप


कृपाल तुमाने, शिवसेना

विद्यमान खासदार – कृपाल तुमाने, शिवसेना

कृपाल बाळाजी तुमाने हे महाराष्ट्र राज्यातील शिवसेना पक्षाचे राजकारणी व सोळाव्या लोकसभेचे सदस्य आहेत. त्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रामटेक मतदारसंघामधून काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार मुकुल वासनिक ह्यांचा पराभव केला.

२०१४ मधील मतांची आकडेवारी

कृपाल तुमाने, शिवसेना – ५ लाख १९ हजार ८९२

मुकुल वासनिक, काँग्रेस – ३ लाख ४४ हजार १०१

किरण प्रेमकुमार रोडगे (पाटणकर), बसपा – ९५ हजार ०५१

नोट – ४ हजार ८०४

मतदानाची टक्केवारी – ६२.६२ टक्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -