घरमहाराष्ट्रनाशिकअजित पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीने सोडला सुटकेचा निःश्वास

अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीने सोडला सुटकेचा निःश्वास

Subscribe

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि आंदोलन स्थगित करण्यात आले.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत थेट उपमुख्यमंदाची शपथ घेतली. त्यामुळे निर्माण झालेल्या राजकिय पेचावर सुप्रीम कोर्टाने बुधवारी बहुमत सिध्द करण्याची मुदत दिली. त्यामुळे अजित पवारांसोबत असलेल्या नाशिक जिल्हयातील आमदारांनी शरद पवारांसोबत राहावे याकरीता जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र दुपारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त येवून धडकताच हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडमोडी घडत आहे. भाजपने सत्ता स्थापन करण्यास नकार दिल्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येउन सरकार स्थापन करणार अशी स्थिती असतांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ऐनवेळी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात मोठा पेच निर्माण झाला होता. दरम्यान, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतेवेळी नाशिक जिल्हयातील राष्ट्रवादीचे सिन्नरचे आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, कळवणचे आमदार नितीन पवार, दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ, निफाडचे आमदार दिलीप बनकर उपस्थित असल्याने या आमदारांच्या भुमिकेबाबत संशय व्यक्त केला जाऊ लागला. शपथविधीनंतर हे आमदार नॉट रिचेबल झाल्याने हा संशय अधिकच बळवला. त्यामुळे या आमदारांचा शोधाशोध सुरू झाला. एकेक करत या आमदारांना मुंबईत राष्ट्रवादीच्या कॅम्पमध्ये दाखल करण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टात धाव घेत विधानसभेत तातडीने बहुमत सिध्द करण्याचे आदेश देण्यात यावेत यासाठी याचिका दाखल केली होती. यावर कोर्टाने निकाल देतानाच बुधवारी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. महाविकासआघाडीकडे १६२ आमदारांचे बहुमत असल्याचा दावा आघाडीने केला तर दुसरीकडे भाजपनेही आपण बहुमत सिध्द करू, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यानच्या काळात अजित पवारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र यात अपयश आल्याने आमदारांची फाटाफुट होऊ नये याकरता शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने आपल्या आमदारांची पडताळणी केली. मात्र तरीही राष्ट्रवादीतील एक गट अजित पवारांच्या पाठीशी जाऊ शकतो या शक्यतेने राष्ट्रवादीने आपल्या आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार सर्वप्रथम देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहोचले. मात्र त्याचवेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

आमदारांवर अविश्वास

नाशिकमध्ये अजित पवार आणि छगन भुजबळ असे दोन गट कार्यरत आहे. अजित पवार यांच्या निर्णयानंतर मात्र कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. ना जल्लोष, ना खंत अशी जिल्हा राष्ट्रवादीची अवस्था झाली होती. जे आमदार अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित होते ते आमदारही आम्ही पवारांसोबत असल्याचे सांगत असल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. हे आमदार पक्षात परतले असले तरी, दगा दिल्यास जिल्हयात फिरू देणार नाही असा इशारा देण्यासाठी राष्ट्रवादीने तात्काळ आंदोलन छेडले यावरून कुठे ना कुठे तरी राष्ट्रवादीचाच आपल्या आमदारांवर विश्वास नव्हता का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला.

- Advertisement -

हेही वाचा –

ठरलं! उद्धव ठाकरेच पुढील पाच वर्षांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -