घरट्रेंडिंगओला, उबर, ऑटोरिक्षा - टॅक्सी सुरू राहणार

ओला, उबर, ऑटोरिक्षा – टॅक्सी सुरू राहणार

Subscribe

संपुर्ण महाराष्ट्रासह मुंबईत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असली तरीही एक समाधानाची गोष्ट आहे ती म्हणजे टॅक्सी, ऑटो, उबर, ओला आणि खाजगी गाड्यांची वाहतूक मात्र सुरू राहणार आहे. महाराष्ट्र वाहतुक आयोगाने लॉक डाऊनच्या कालावधीत या सेवा सुरू राहतील असे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र आणि मुंबई लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ही एक मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या बेस्ट उपक्रमाची बससेवा, मुंबई उपनगरीय लोकल सेवा आणि मेट्रो, मोनो तसेच एसटी यासारख्या सेवा बंद झालेल्या असल्या तरीही खाजगी वाहतुकीच्या सुविधा मात्र सुरू राहणार आहेत. खाजगी वाहनांची वाहतुक सुरू असल्यानेच आज सकाळपासूनच मुंबईतल्या टोल नाक्यांवर वाहनांची मोठी गर्दी पहायला मिळाली. मुलुंड टोल नाक्यावरून मुंबई येण्यासाठी तसेच मुंबईतून बाहेर पडण्यासाठी वाहनांच्या मोठ्याच मोठ्या रांगा याठिकाणी पहायला मिळाल्या.

अत्यावश्यक सेवांमध्ये सार्वजनिक वाहतुक उपक्रमाच्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. पण शहराअंतर्गत दळणवळणासाठी मात्र काही सेवा सुरू राहणार आहेत. त्यामध्ये बेस्ट बससह टॅक्सी, ओला, उबर आणि खाजगी वाहतुकीच्या सेवा सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवांसाठी राज्य सरकारमार्फत वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये दैनंदिन सेवा पुरवठादार सेवांमध्ये महापालिकेचे कर्मचारी, वीज कर्मचारी यासारख्या सेवांचा समावेश आहे.

- Advertisement -

अशी आहे अत्यावश्यक सेवा पुरवठादारांची व्यवस्था –

Emergency services
आपत्कालीन सेवा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -