मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा २१ ऑगस्टपासून पुन्हा सुरू

पूरस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या वेळापत्रकात बदल

Mumbai
mahajanadesh yatra
महाजनादेश यात्रा

माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती यामुळे थांबविण्यात आलेली मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा २१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा पूर्वनियोजित दुसरा टप्पा १७ ऑगस्टला होणार होता. मात्र, महाराष्ट्रातील पूर परिस्थितीमुळे पूर्वनियोजित दुसरा टप्पा ५ दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

दुसरा टप्पा २१ ऑगस्ट रोजी नंदुरबार येथून सुरू 

पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे पहिल्या टप्प्यातील यात्रा मुख्यमंत्र्यांनी स्थगित केल्याने हा दुसरा टप्पा २१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. हा टप्पा ११ दिवसांचा असणार असून तो नंदुरबार येथून सुरू होणार आहे. महाजनादेश यात्रा दुसऱ्या टप्प्यात १४ जिल्हे , ५५ मतदारसंघात जाणार आहे. यात ३९ जाहीर सभा, तर ५० स्वागत सभा होतील.

३१ ऑगस्टला सोलापूर येथे यात्रेचा समारोप 

दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा १८३९ किमी प्रवास करणार असून समारोप ३१ ऑगस्टला सोलापूर येथे होणार आहे. महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा गणेशोत्सव संपल्यावर होणार असल्याचं आमदार ठाकूर म्हणाले. सांगली, कोल्हापूर येथील पूरस्तिथीमुळे ३ दिवस पुर्वीच पहिला टप्पा बंद झाला होता, जो आता सुरू होणार आहे. महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा गणेशोत्सव संपल्यावर होणार असल्याचे आमदार सुरजित सिंह ठाकूर यांनी सांगितले. सांगली, कोल्हापूर येथील पूरस्तिथीमुळे ३ दिवस अगोदरच पहिला टप्पा बंद झाला होता, जो आता सुरू होणार आहे. पूरग्रस्त भाग असलेले पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर हे जिल्हे महाजनादेश यात्रेतून वगळले असल्याची माहिती यात्रा प्रमुख आमदार सुजीतसिंह ठाकूर यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here