घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांची मध्यस्थी निष्फळ; अनिल गोटे लोकसंग्रामकडून निवडणूक लढवणार

मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी निष्फळ; अनिल गोटे लोकसंग्रामकडून निवडणूक लढवणार

Subscribe

धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीवरुन संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि भाजप आमदार अनिल गोटे यांच्यात रणकंदन माजले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दोघांमध्ये दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्र्यांनी तीन तास बैठक घेऊनही त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे सर्वाधिकार गोटे यांच्याकडे दिल्याचे कालपर्यंत बोलले जात होते. मात्र आपल्यासोबत दगाफटका होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवून गोटे यांनी आगामी निवडणूक लोकसंग्राम पक्षातर्फे लढवणार असल्याचे आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे.

अन गोटेंनी खडसेंसमोर चक्क हात जोडले

भाजपचे आमदार अनिल गोटे हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून धुळे मनपा निवडणुकाचा वाद शमतोन शमतो तोच त्यांनी पुन्हा एकदा हाती बंडाचे निशाण घेतेले आहे.

- Advertisement -

अनिल गोटे हे लोकसंग्राम पक्षाकडून पुर्वी एकदा आमदार झाले होते. तसेच धुळे महानगरपालिकेत या पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या पत्नी हेमा गोटे या महापौर सुद्धा होत्या.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -