घरमहाराष्ट्रदोन तासात ८ कोटी; हा मराठा समाजाचा विजय - छत्रपती संभाजीराजे

दोन तासात ८ कोटी; हा मराठा समाजाचा विजय – छत्रपती संभाजीराजे

Subscribe

८ कोटींच्या खर्चाला सरकारची मान्यता

सारथी संस्थेवरुन बराच वादंग निर्माण झाला होता. सारथीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि संस्थेची स्वायत्तता आदी विषयावरून वाद सुरू होते. या वादावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर दोनच तासात आठ कोटी रुपयांचा निधी संस्थेला सुपूर्द केला. यावर छत्रपती संभाजीराजे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी शासनाने दिलेलं पत्र ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “सारथी! दोन तासात ८ कोटी रुपयाचा निधी मिळवता आला. सर्व मागण्या मान्य करून घेता आल्या. ही समाजाची ताकद आहे. हा मराठा समाजाचा विजय आहे. समाजात एकी असली की सर्व काही करून घेता येतं. स्वायत्त आणि सक्षम सारथी गरीब मराठा समाजातील गुणवंत युवकांच्या जीवनात क्रांती घडवेल. राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने उभारलेली ही संस्था सर्वार्थाने लोक कल्याणकारी ठरेल असा विश्वास आहे,” असं संभाजीराजे यांनी म्हटलं.

- Advertisement -

ठाकरे सरकारनं शब्द पाळला… – अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सारथीसंदर्भात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. “सारथी संस्था बंद होणार नाही. मागील काही काळात गैरसमज निर्माण झाले होते. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांमध्ये चुकीचा संदेश गेला होता. मात्र, हे होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अखत्यारीत घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सारथीला उद्याच विजय वडेट्टीवार हे आठ कोटी रुपयांची मदत देतील,” असं अजित पवार म्हणाले.


हेही वाचा – कोरोना पॉझिटिव्ह असल्याची अफवा पसरवून डॉक्टरच्या मुलाला मारहाण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -